रोहयोचे काम : बिलाच्या वादातून घटनायवतमाळ : येथील पंचायत समितीच्या कंत्राटी तांत्रिक कृषी अधिकाऱ्यावर रोहयो कंत्राटदाराने चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजता घडली. पंचायत समितीत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.रोजगार हमी योजना कक्षाचे तांत्रिक कृषी अधिकारी शशिकांत मुंगले कामात व्यस्त असताना उमरसरा येथील विशाल मिश्रा याने वृक्ष लागवड मस्टरवरून वाद घातला. मुंगले यांनी न केलेल्या कामाचे मस्टर तयार करण्यास नकार दिला. यावरून मिश्रा याने वाद घालत थेट मुंगले यांच्यावर चाकू हल्ला केला. सुदैवाने मुंगले यांनी चाकू हातात पकडला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. त्याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आरोपी विशाल मिश्राच्याविरोधात गुन्हा नोंदविला.पंचायत समितीतील रोजगार हमी योजना कक्ष सातत चर्चेत राहतो. काही दिवसापूर्वी या रोजगार हमी योजनेची बोगस मेजरमेंट बुक आणि मस्टर करणारी टोळीच असल्याचे प्रकरण पुढे आले होते. आता थेट कर्मचाऱ्यावर चाकु हल्ला करण्यापर्यंत कंत्राटदारांची मजल गेली. (कार्यालय प्रतिनिधी)
पंचायत समितीत कंत्राटी कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला
By admin | Updated: July 11, 2015 00:03 IST