शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अखेर फिर्यादीच निघाला मारेकरी

By admin | Updated: September 22, 2014 23:35 IST

येथील साई नगरतील कल्पना शिवकुमार जोन्नलवार या ५० वर्षीय विधवा महिलेच्या खुनाची पोलिसांत फिर्याद देणाराच अखेर मारेकरी निघाला. पोलिसांनी रविवारी सायंकाळी फिर्यादी चंद्रशेखर गंगशेट्टीवार

जोन्नलवार हत्या प्रकरण : रहस्य कायम, मालमत्ता कारणीभूत असण्याची शक्यता वणी : येथील साई नगरतील कल्पना शिवकुमार जोन्नलवार या ५० वर्षीय विधवा महिलेच्या खुनाची पोलिसांत फिर्याद देणाराच अखेर मारेकरी निघाला. पोलिसांनी रविवारी सायंकाळी फिर्यादी चंद्रशेखर गंगशेट्टीवार याला अटक करून सोमवारी न्यायालयासमोर उभे केले. रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे गेल्या १० आॅगस्टला रात्री २ वाजताच्या सुमारास कल्पना यांचा त्यांच्याच घरातील दिवाणामध्ये कोंबलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता़ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या प्रकरणी फिर्यादी चंद्रशेखर गंगशेट्टीवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवि ३0२ नुसार खुनाचा, तर भादंवि २0१ नुसार पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे मृतक कल्पना ९ आॅगस्टपासून घरी एकट्याच होत्या़ ९ आॅगस्टलाच त्यांचा साई नामक २५ वर्षीय मुलगा चंद्रशेखर यांच्या मध्यप्रदेशातील विवाहित मुलीकडे अर्थात साईच्या मावस बहिणीकडे चंद्रशेखर यांच्या श्रेयस नामक मुलासोबतच रक्षाबंधनासाठी गेला होता. हीच संधी साधून कल्पना यांचा खून करण्यात आला होता.रक्षाबंधनाला मृतक कल्पनाचे बंधू अनिल रेगुंडवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथून वणीत आले होते. त्यांच्या वणीत मृतक कल्पनासह इतर दोन बहिणी राहतात. प्रथम ते सविता यांच्या घरी गेले. याच सविताचे चंद्रशेखर गंगशेट्टीवार हे यजमान आहेत. सविताने राखी बांधल्यानंतर अनिल दुसरी बहिण वर्षा यांच्याकडे गेले होते. सरतेशेवटी ते मोठी बहिण मृतक कल्पना यांच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांच्या घराचे प्रवेशव्दार बंद आढळले. तसेच कल्पना यांचा मोबाईलही ‘स्वीच आॅफ’ येत होता. अनिल यांनी शेजारी विचारपूस केली असता, कल्पना कुठेच आढळल्या नव्हत्या. त्यानंतर सर्व नातेवाईक त्याच दिवशी रात्री सविता चंद्रशेखर गंगशेट्टीवार यांच्या घरी गोळा झाले होते. या सर्व प्रकारानंतर चंद्रशेखर गंगशेट्टीवार यांनीच वणी पोलिसांत तक्रार दिली. त्याच रात्री मृतक कल्पना यांच्या चंद्रपूर येथील प्रिया आणि अहेरी येथील प्रियंका नामक विवाहित मुली वणीत दाखल झाल्या होत्या. मुली आणि जावई मृतक कल्पना यांच्या घरी झोपण्यासाठी गेल्या असता बेडरूममधील दिवणामध्ये कल्पनाचा मृतदेहच आढळून आला होता. या खुनाच्या तपासासाठी वणी पोलिसांनी यवतमाळ येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते़ त्यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून कल्पना यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान मृतक कल्पना यांचा मोबाईलही गहाळ होता. संंबंधित कंपनीकडून पोलिसांनी त्यातील कॉल डिटेल्स मागविले होते. कल्पना यांच्या घरातील सर्व कागदपत्रेही पोलिसांनी तपासली़ तरीही महिना लोटूनही पोलीस खऱ्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. विविध संघटनांनी या खुनाचा छडा लावण्यासाठी ठाण्यावर धडक दिली होती. मात्र आरोपी गुलदस्त्यातच होता.परिस्थितीजन्य पुरावे आणि तपासातून या खुनाचा अखेर उलगडा झाला. परिस्थितीजन्य पुराव्यांमध्ये अत्यंत गुंतागुंत असल्याने खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना उशीर झाला. हत्यारा कुणी तरी परिचित, निकटवर्तीय असावा, या दिशेने पोलिसांनी प्रथमपासूनच तपासाची चक्रे फिरविली होती. अखेर त्यांचा ‘होरा’ खरा ठरला अन् कल्पन्ना यांच्या खुनाची फिर्याद देणारा चंद्रशेखर हाच आरोपी निघाला. त्याला रविवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली. सोमवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास त्याला न्यायालयासमोर उभे केले. (कार्यालय प्रतिनिधी)