शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ख्वाजा बेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:28 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अखेर विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी बेग यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. यवतमाळसह १४ जिल्ह्यांच्या नियुक्त्या अनेक महिन्यांपासून रखडल्या होत्या. त्यावर अखेर तोडगा निघाला.

ठळक मुद्देआधी आमदारकी, आता जिल्ह्याचीही जबाबदारी : घुईखेडकर, ठोकळ, गाडबैले बाद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अखेर विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी बेग यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. यवतमाळसह १४ जिल्ह्यांच्या नियुक्त्या अनेक महिन्यांपासून रखडल्या होत्या. त्यावर अखेर तोडगा निघाला.यवतमाळचे जिल्हाध्यक्षपद नानाभाऊ गाडबैले यांच्याकडे होते. परंतु दोन टर्मनंतर त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर नव्या जिल्हाध्यक्षाचा राष्ट्रवादीमध्ये शोध सुरू झाला. वसंत घुईखेडकर, सुभाष ठोकळ, ख्वाजा बेग, उत्तमराव शेळके, राजू पाटील अशी काही नावे चर्चेत होती. नानाभाऊ गाडबैले यांना रिपीट करावे, असाही काहींचा आग्रह होता. नावांबाबत एकमत होत नसल्याने जिल्हाध्यक्षांची ही नियुक्ती गेली काही महिने साईडला पडली होती. अलिकडेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली. त्यात घुईखेडकर की ठोकळ या पैकी एकाचा निर्णय होणार होता. मात्र घुईखेडकरांच्या नावाला पक्षातील एका नेत्याने विरोध दर्शविला. त्याच वेळी दुसऱ्या नावाच्या समर्थकांची बैठकीतील ‘अभद्र वागणे’ अजितदादांना चांगलेच खटकले. त्यांनी या समर्थकांची झाडाझडती घेतली. त्यामुळे ही दोन्ही नावे बाद झाली आणि गाडबैले यांना रिपीट करायचे नव्हते, म्हणून ख्वाजा बेग यांचे नाव पुढे आले.अल्पसंख्यकांना पाठबळयवतमाळात काँग्रेसचे अध्यक्षपद डॉ. वजाहत मिर्झा यांच्याकडे आहे. त्यामुळे काँग्रेसला काऊंटर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद ख्वाजा बेग यांना द्यावे, असा विचार पुढे आला. त्याचा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल, राष्ट्रवादीसुद्धा अल्पसंख्यकांच्या मागे असल्याचा संदेश जाईल, असे नेत्यांना पटवून सांगण्यात आले. त्याबाबत एकमत झाल्याने अखेर आमदार ख्वाजा बेग यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.बेग यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढणार आहे. त्यांची नियुक्ती काँग्रेसला काऊंटर करण्यात तसेच अल्पसंख्यकांना आपल्याकडे खेचण्यात कितपत उपयोगी ठरते, हे काळच ठरवेल.तीन विधानसभा मतदारसंघांवर दावाजिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी पुसदची जागा आमदार मनोहरराव नाईक यांच्या रुपाने राष्ट्रवादीकडे आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादीने यवतमाळ, दिग्रस-दारव्हा व वणी मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यापैकी काँग्रेसकडून दिग्रस-दारव्हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सहज सोडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे मित्र प्रेमापोटी वणीतील जागेसाठी प्रचंड आग्रही आहेत. वणीतील जागेसाठी आपली परळीची जागा सोडण्याची तयारीही त्यांनी दर्शविली होती. त्यांचा हट्ट कायम राहिल्यास दिग्रस-दारव्हा ऐवजी वणीची जागा राष्ट्रवादीला वाटाघाटीत सुटण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे. वणीत काँग्रेस मात्र कोणत्याही परिस्थिती जागा सोडणार नाही, अशा भूमिकेत आहे. सोबतच जिल्ह्यात पुसद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदच किती, असा सवालही काँग्रेसच्या गोटातून उपस्थित केला जात आहे.लोकसभेतही ‘चेंज’ची चाचपणीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा सातत्याने पराभव होत आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीलाही वाशिममध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी लोकसभा मतदारसंघात चेंज करता येईल का या दृष्टीनेही राष्ट्रवादीची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.जिल्हाभर पक्षसंघटन खिळखिळे, नवसंजीवनीचे आव्हानजिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन खिळखिळे झाले आहे. नाईकांमुळे पुसदमध्ये काय ती तेवढी राष्ट्रवादीची ताकद आहे. पक्षाची आंदोलने नाही, कार्यक्रम नाही, मेळावे नाही, पक्षाच्या कार्यालयात कायम शुकशुकाट असे विदारक चित्र जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी एका सभापतीपदावर सत्तेत असली तरी त्यातही दहा सदस्यांच्या एकजुटीमुळे पुसदचा गट स्ट्राँग झाला आहे. गटनेता बदलवून या नाराज दहा सदस्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असल्याचे तेथील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह््यात राष्ट्रवादी काँग्रेस अनेक तालुकास्तरावर नामफलकापुरती उरली आहे. कित्येक गावात तर फलकेही नाहीत. वणीपासून उमरखेडपर्यंत कुठेच राष्ट्रवादीची ताकद नाही. कधी काळी यवतमाळात दिसणारी गर्दीही विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहून केव्हाच ओसरली आहे. पक्षाच्या उमेदवाराला शहरात मिळालेली दोन-चार हजार मते लक्षात घेता यवमाळात पक्षाची अवस्था काय याची कल्पना येते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद आमदार ख्वाजा बेग यांच्यासाठी मोठे आव्हान ठरले आहे. लोकसभा निवडणुकांना किमान सहा महिने अवधी असल्याने या काळात त्यांना पक्षबांधणीसाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागणार आहे. त्यात त्यांना पुसद व यवतमाळच्या दोनही प्रमुख नेत्यांची कशी साथ मिळते यावरसुद्धा पक्षाचे यश-अपयश व बांधणी अवलंबून आहे. त्यांना नेत्यांकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यास ख्वाजा बेग निश्चितच जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करतील अशी सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.राष्ट्रवादीने दिला काँग्रेसला ‘चेकमेट’काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद डॉ. वजाहत मिर्झा यांच्या रुपाने अल्पसंख्यकाकडे आहे. त्यातच त्यांना विधान परिषदेचे सदस्य पदही देण्यात आले. या माध्यमातून काँग्रेस अल्पसंख्यकांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून राष्ट्रवादीनेही काँग्रेसला काऊंटर करण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद ख्वाजा बेग यांना दिले. बेग यांना यापूर्वीच आमदारकी देण्यात आली आहे. त्यांच्या आमदारकीचे राष्ट्रवादीने जिल्हाभर मार्केटिंगही केले होते. धर्मनिरपेक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद आमदार असलेल्या अनुक्रमे मिर्झा व बेग यांच्याकडे आल्याने जिल्हाभरातील अल्पसंख्यकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस