शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

केळापूर, पुसद एसडीओ हायटेक

By admin | Updated: January 31, 2015 00:13 IST

कागदपत्रांची पूर्तता करूनही जात प्रमाणपत्र महिनोंगणती मिळत नव्हते. उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते.

यवतमाळ : कागदपत्रांची पूर्तता करूनही जात प्रमाणपत्र महिनोंगणती मिळत नव्हते. उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. आता केळापूर आणि पुसद तालुक्यातील नागरिकांची ही समस्या दूर झाली असून तेथील नागरिकांना आॅनलाईन जात प्रमाणपत्र दिले जात आहे. लवकरच संपूर्ण जिल्ह्यात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्यासाठी सर्वच क्षेत्रात संगणकीकरण केले जात आहे. ग्रामीण आणि सर्वसामान्यांशी नाळ जुळली असलेल्या महसूल विभागाला पूर्णत: अद्यावत करण्याचे काम सुरू आहे. सातबारा आणि तत्स्म काही प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता जात प्रमाणपत्रही आॅनलाईन दिले जात आहे. सर्वात प्रथम प्रमाणपत्र देण्याचा मान केळापूर आणि पुसद उपविभागीय कार्यालयाला मिळाला आहे. केळापूर येथील उपविभागीय अधिकारी संदीप महाजन तर पुसद येथील चंद्रकांत जाजू यांनी आपल्या डिजीटल स्वाक्षरीचा वापर करून आॅनलाईन जात प्रमाणपत्र वितरित केले आहे. मुहूर्तालाच आतापर्यंत दोनही कार्यालयाकडून ३८ प्रमाणपत्र वितरित केले आहे.लवकरच ही प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात राबविली जाणार आहे. महाआॅनलाईची संकल्पना घेऊन महसूल प्रशासनाच्या एकंदर कार्यपद्धतीतच बदल केला जात आहे. पूर्वी ठराविक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चकरा माराव्या लागत होत्या. यात अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होत होता. तहसील कार्यालयात पालकांची झुंबड दिसत होती. हीच संधी साधून दलालही सक्रिय झाले होते. आता आॅनलाईन प्रणालीमुळे थेट उमेदवाराला प्रमाणपत्राची प्रिन्ट काढता येणार आहे. शिवाय बायनरी कोडवरून आपल्या प्रमाणपत्राच्या अर्जाची स्थिती काय आहे हेसुद्धा जाणून घेता येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)