शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

ग्रामसभेच्या ठरावाला दाखविली केराची टोपली

By admin | Updated: August 10, 2015 02:14 IST

येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांची यादी तयार केली.

दारव्हा पंचायत समिती : विधवा महिला विहिरीपासून वंचितमहागाव (कसबा) : येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांची यादी तयार केली. या यादीचा ठराव पंचायत समितीकडे पाठविण्यात आला. त्यानंतरही दारव्हा पंचायत समितीने या ठरावातील पात्र लाभार्थी महिलेला डावलून ठरावाला केराची टोपली दाखविली. महागाव (कसबा) ही ग्रामपंचायत दारव्हा पंचायत समिती अंतर्गत येणारी सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गरीब अल्पभूधारक, विधवा अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांकरिता रोजगार हमी योजनेमधून विहिरींचे वाटप करण्यात येते. महागाव कसबा खंड क्र.१ साठी १० विहिरींचे व महागाव कसबा खंड क्र.२ साठी पाच विहिरींचे असे एकूण १५ विहिरींचे उद्दिष्ट या ग्रामपंचायतीला देण्यात आले होते. ग्रामसभेद्वारे गरजू लाभार्थ्यांची निवड करून तो ठराव पंचायत समितीला देणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीने १५ आॅगस्ट २०१३ रोजी ग्रामसभा घेऊन लाभार्थ्यांची निवड केली. खंड क्र.१ साठी दहा आणि खंड २ साठी पाच लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्यरेषा, विशेष मागासप्रवर्ग अशा पद्धतीने लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. हा ठराव पंचायत समितीलाही पाठविला. काही विहिरींचे खोदकाम आणि बांधकामही पूर्ण झाले. मात्र ठरावातील अनुक्रमांक ४ वर नाव असलेल्या आशाबाई काशीनाथ दुधे या विधवा महिलेचे नाव पंचायत समितीमध्ये जाणीवपूर्वक वगळण्यात आले. वास्तविक पाहता सर्वच निकषात या महिलेचा प्रस्ताव बसणारा आहे. तरीही तिला लाभापासून वंचित ठेवण्यात आले. ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या यादीत नाव असतानाही पंचायत समितीने हे नाव का वगळले, हे कोडेच आहे. एकीकडे शासनाने विहिरींची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. अशावेळी दारव्हा पंचायत समितीतून मात्र गरजूंना डावलण्याचे काम होत आहे. या संदर्भात विधवा महिलेने आपल्या विहिरीच्या प्रस्तावाचे काय झाले, या बाबत वारंवार पंचायत समितीमध्ये चकरा मारल्या. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी केवळ नियमांचा पाढा वाचून दाखविला. या संदर्भात कुठलाही गावपुढारी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावलेला नाही. महागाव कसबा गावातील निवड झालेल्या सर्वच लाभार्थ्यांच्या विहिरीची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. दिल्या गेलेल्या विहिरी आणि त्यांचे लाभार्थी नियमात बसतात की नियमबाह्यपणे त्यांना विहिरी मंजूर झाल्या, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. आपल्यावरील अन्याय दूर न केल्यास वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा आशाबाई दुधे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)