शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मित्रच ठरला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३३९ शेतकऱ्यांना सर्पदंश : गतवर्षी ५०१ शेतकºयांना चावला साप

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यात शेतशिवार हिरवेकंच होते. यामुळे पायाखालची जमीनही दृष्टीस पडत नाही. अशा परिस्थितीत श्वापदांचा वावर वाढतो. पिकांमध्ये बिनधास्त फिरताना सर्पदंशाचा धोकाही वाढतो. दरवर्षी अशा शेकडो घटना घडतात. अलीकडे या घटना वाढत आहेत. जुलै ते सप्टेंबरमध्ये सर्पदंशाची अनेक प्रकरणे पुढे येतात. जिल्ह्यात सात महिन्यात ३३९ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वैैैैैद्यकीय महाविद्यालयाने केली आहे.यामध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकºयांच्या पिकांचे संरक्षण करणारा साप शेतकºयांसाठीच कर्दनकाळ ठरला.यवतमाळ जिल्हा हा डोंगरांनी वेढला आहे. सह्याद्री पर्वतरांगेचे हे सर्वात शेवटचे टोक आहे. सापांना पोषक वातावरण या भागात आहे. यामुळे सापांच्या विविध दुर्मिळ प्रजाती या भागात पहायला मिळतात. सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. कारण तो शेतशिवारात उंदीर आणि इतर किड्यांना खातो. मात्र त्यावर पाय पडला तर तो शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरतो.पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर महिन्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. या महिन्यात पीक जोमदार अवस्थेत असतात. पोषक वातावरणाने पीक जोमाने वाढतात. यामुळे जमीन दिसत नाही. फवारणी अथवा निंदण करण्यासाठी गेले तर अशा ठिकाणी दडून असलेला साप बाहेर पडतो. आपला पाय पडल्याने साप स्वत:चा जीव वाचविण्यासाठी प्रतीहल्ला चढवितो. यात शेतकरी, शेतमजूर जखमी होतात.अनेकवेळा साप चावल्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यापूर्वी मांत्रिकाकडे नेले जाते. काही जागृक शेतकरी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्यांना दवाखान्याकडे नेतात. त्या ठिकाणी सर्पदंशावर उपचार केला जातो. यातून ९९ टक्के शेतकरी बरे होतात.शेतकऱ्यांना रखवालीसाठी अनेकवेळा रात्रीला जावे लागते. रात्री रखवाली करताना सर्पदंशाच्या घटना घडतात. तर वीज भारनियमनामुळे रात्रीच्या शेड्यूललाच पाणी येते. अशा परिस्थितीत शेतकरी रात्री शेतशिवारात असतात. या ठिकाणी सर्पदंशाच्या घटनेचा सामना करावा लागतो. यामुळे सर्पदंशाच्या संख्येत वारंवार भर पडत आहे.दवाखान्यापर्यंत येणारे रुग्ण वाचतातसाप चावल्यानंतर त्याला वैदूकडे न नेता दवाखान्यात आणले तर त्याचा प्राण वाचतो. याकरिता प्रथमोपचारही तत्काळ करता येतात. मात्र डॉक्टरांपर्यंत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पोहोचविले पाहिजे.

टॅग्स :snakeसापFarmerशेतकरी