शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस पुरेल इतकाच बारदाना

By admin | Updated: April 26, 2017 00:11 IST

नव्याने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्याजवळ दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक आहे

३१ कोटींचे चुकारे रखडले : ३५ हजार क्विंटल तुरीचे ट्रान्सपोर्ट थांबले यवतमाळ : नव्याने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्याजवळ दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक आहे. यामुुळे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर तत्काळ बारदाना न पोहोचल्यास स्थिती स्फोटक होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १३ केंद्रावर ६३ हजार ५०० क्विंटल तूर पडून आहे. ही तूर खरेदी करण्यासाठी एक लाख २७ हजार पोती लागणार आहे. प्रत्यक्षात या केंद्राजवळ २४ हजार पोतेच शिल्लक आहे. यामध्ये १२ हजार क्विंटल तूर मोजता येणार आहे. एका दिवसातच हा बारदाना संपणार आहे. यामुळे इतर तुरीची खरेदी करण्यासाठी केंद्राजवळ पोतेच नाही. २२ एप्रिलनंतर एक दानाही तूर खरेदी करायची नाही. असाच केंद्र शासनाचा प्रयत्न होता. यामुुळे अनेक अडचणी निर्माण करून बारदाना रोखण्यात आला. अजूनही या केंद्रावर बारदाना नाही. ६३ हजार ५०० क्विंटल तूर खरेदी करण्यासाठी १३ केंद्रांना एक लाख २७ हजार पोते बारदाना लागणार आहे. हा बारदाना मिळविण्याच्या प्रतीक्षेत पुन्हा शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात तूर खरेदी झाली. यामुळे १५ केंद्रांतील तूर खरेदीचा शासकीय आकडा एक लाख ९५ हजार क्विंटलच्या घरात पोहोचला आहे. या तुरीचे किंमत ९५ कोटी ७८ लाख रूपयांच्या घरात आहे. खरेदी झालेल्या तुरीपैकी ६४ कोटींच्या तुरीचे चुकारे झाले आहे. ३१ कोटी ५३ लाख रूपयांचे चुकारे महिन्यापासून बाकी आहेत. शेवटच्या चार दिवसात खरेदी झालेली ३५ हजार ३०२ क्विंटल तूर केंद्रावर पडून आहे. २२ एप्रिलला तूर खरेदी केंद्र बंदची घोषणा झाली. यामुळे खरेदी झालेली तूर केंद्रावरच पडून आहे. या तुरीचे ट्रान्सपोर्ट बाकी आहे. सीडब्ल्यूसी आणि वखार महामंडळात तूर ठेवण्यासाठी जागा नाही. जोपर्यंत ही तूर गोदामात पोहोचणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणारे चुकारे थांबणार आहे. (शहर वार्ताहर) नऊ हजार शेतकऱ्यांचा मुक्काम मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदीचा अहवाल मागविल्यानंतर तहसीलदारांनी प्रत्येक शासकीय केंद्रावर जाऊन रजिस्टरच्या नोंदी घेतल्या. हे रजिस्टर अंतिम शेतकऱ्याच्या नावावर स्वाक्षरी करून सिल करण्यात आले.