शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

नुसत्या घोषणा... शेतकऱ्यांची खाती रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 21:23 IST

अतिवृष्टीमुळे चार लाख शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदतीची घोषणा केली. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला. मात्र, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकारामुळे हा निधी थांबला होता. समान काम वाटून दिल्यानंतरही काही तालुक्यांमध्ये ग्रामसेवकांनी या कामामधून काढता पाय घेतला. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वळती झाली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिवाळीपूर्वीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा व्हावी यासाठी शनिवारीही जिल्ह्यातील सर्व बॅंका सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी शेतकऱ्यांनी बॅंकांत गर्दी केली होती. मात्र राष्ट्रीयीकृत बॅंका बंदच राहिल्या. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या दिला. याच ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. अतिवृष्टीमुळे चार लाख शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदतीची घोषणा केली. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला. मात्र, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकारामुळे हा निधी थांबला होता. समान काम वाटून दिल्यानंतरही काही तालुक्यांमध्ये ग्रामसेवकांनी या कामामधून काढता पाय घेतला. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वळती झाली नव्हती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर कर्मचारी कामाला लागले. यानंतर शेतकऱ्यांना मंजूर झालेली रक्कम  बॅंकांमध्ये वळती करण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु, याच वेळेस सर्व्हर आणि इतर काही अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते झाले नाहीत. यातून गावस्तरावर प्रचंड संताप नोंदविला जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. 

शेतकरी म्हणाले आता घरी काय सांगणार?- काही संतप्त शेतकरी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांच्या हातात पिशव्या होत्या. दुसऱ्या हातात पासबुक होते. गत चार दिवसांपासून बॅंकांच्या येरझारा मारत आहेत. मात्र, अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत. आता दिवाळी कशी करू, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. सरकारच्या भरवश्यावर आम्ही दिवाळी करीत नाही; परंतु, सरकारच आश्वासन देते. यामुळे आम्ही बॅंकांमध्ये गेलो. मात्र, खात्यात पैसेच नाहीत. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. पुढे सुट्या आहेत. बॅंकेत काय पैसे जमा होतील, शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी असल्याचे मत आत्माराम बेंडे, अनुप चव्हाण, चरणसिंग नाईक, बापू डोळे, अविनाश रोकडे, रामसिंग राठोड, देवराव राठोड, देवराव बांडबुजे आदींनी  व्यक्त केले. 

५०० शेतकरी परतले - जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंका सुरू राहतील, असे प्रसिद्धीपत्रक काढले. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंका अनेक ठिकाणी बंद होत्या. दारव्हा येथे ५०० च्या वर शेतकऱ्यांनी बॅंकेच्या बाहेर गर्दी केली होती. बॅंकच न उघडल्याने शेतकरी रिकाम्या हाताने परतले. ना नुकसानीची,  ना पीकविम्याची मदत - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह पीकविमा आणि सानुग्रह अनुदान वाटपाची घोषणा सरकारकडून झाली; परंतु, रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळतीच झाली नाही. आरबीआयने बॅंक सुरू ठेवण्याचे निर्देशच दिले नाही. 

राष्ट्रीयीकृत बॅंक सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यासाठी आरबीआयला विनंती केली. मात्र, त्यांनी याची दखल घेतली नाही. काही ठिकाणी त्रुटी होत्या. २५ तारखेला बॅंक सुरू राहणार आहे. त्यावेळी बहुतांश खात्यात पैसे असतील. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी

 

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनbankबँक