शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाचे घर फोडणारा विद्यार्थी जेरबंद

By admin | Updated: May 22, 2016 02:11 IST

सप्तगिरीनगरमधील प्रा.सुरेश आसोले यांच्या घरातून सव्वादोन लाख रोख व सोन्याचे दागिने असा चार लाख ६५ हजारांचा ऐवज चोरणाऱ्या ....

सीसीटीव्हीची मदत : साडेचार लाखांचा ऐवज चोरल्याचे प्रकरणपुसद : सप्तगिरीनगरमधील प्रा.सुरेश आसोले यांच्या घरातून सव्वादोन लाख रोख व सोन्याचे दागिने असा चार लाख ६५ हजारांचा ऐवज चोरणाऱ्या ‘त्या’ सुशिक्षित आरोपीस वसंतनगर पोलिसांनी १० तासात जेरबंद केले. न्यायालयाने त्याला २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, हा आरोपी येथीलच पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे.वैभव पठाडे (२१) रा.संभाजीनगर, पुसद असे आरोपीचे नाव आहे. वसंतनगर पोलिसांनी त्याच्याकडून रोख १० हजार व साडेतीन तोळे सोन्याची पोत हस्तगत केली आहे. येथील सप्तगिरीनगरातील रहिवासी प्रा.सुरेश शामराव आसोले हे १८ मे रोजी बुलडाणा येथे परीक्षक म्हणून गेले होते. त्यांची पत्नी माहेरी गेली होती. घर बंद असल्याचा फायदा घेवून आरोपी वैभव पठाडे याने घराचा कुलूपकोंडा तोडून मुद्देमाल लंपास केला. मात्र प्रा.आसोले यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वैभव कैद झाला. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी वैभव पठाडे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.वैभव हा येथील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असून चोरीच्या इतरही घटनांमध्ये त्याच्या सहभागाची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चोरीच्या प्रकरणात विद्यार्थी आरोपी निघाल्याने शहरात नाना तऱ्हेचे तर्क लढविण्यात येत आहे. अटकेची ही कारवाई वसंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवराव राठोड, सचिन ढोके, नीलेश शेळके, स्वप्नाली धृतराज, पंकज पातूरकर, भाऊ तळेकर, भाऊ गंधे, मोरे, घुगे, अशोक चव्हाण, जुनेद, तामशेट्टे आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)