शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जूनमध्ये ७१ टँकरने ८१ गावांना पाणीपुरवठा

By admin | Updated: June 18, 2016 02:00 IST

गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाने कधी नव्हे ते जिल्ह्याला उन्हाळाभर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

जलस्रोतात घसरण : घाटंजी तालुक्यात परिस्थिती हाताबाहेर, शेतकऱ्यांसोबत प्रशासनालाही पावसाची प्रतीक्षा यवतमाळ : गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाने कधी नव्हे ते जिल्ह्याला उन्हाळाभर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जून महिन्यात पाणीटंचाईचे शुक्लकाष्ट संपेल अशी प्रशासनासोबतच सर्व सामान्यांना आशा होती. मात्र जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नाही. परिणामी ८१ गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ७१ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. परंतु जून महिना आला की संपेल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र राज्यात मान्सूनचे आगमन लांबले. याचा फटका जिल्ह्यालाही बसला. जिल्ह्याच्या भूजल पातळीत अर्धा मीटरने घसरण नोंदविली गेली. पेयजलाची स्थिती अधिकच बिकट झाली. यावर मात करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. काही गावात बैलगाडीच्या मदतीने पाणीपुरवठा होत आहे. काही गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या.जिल्ह्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती जून महिन्यात घाटंजी तालुक्यात निर्माण झाली आहे. सर्वाधिक १७ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा केला जात आहे. आर्णी तालुका ११, नेर चार, महागाव दोन, वणी एक, पुसद १५, दारव्हा दोन, उमरखेड दोन, राळेगाव दोन, पांढरकवडा एक असा टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ८५ गाववाड्या, वस्त्या आणि पोडावर टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ खासगी आणि ५९ शासकीय टँकरचा समावेश आहे. जून महिन्यात कधी नव्हे ती भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावातील जलपातळी आणखी खालवत आहे. मध्यंतरी झालेल्या अकाली पावसाने दिलासा मिळाला होता. मात्र गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून व पाणीटंचाईचा प्रश्नही तीव्र झाला आहे. यवतमाळ, पुसद शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. प्रशासनावरही पाणी पुरवठ्याचा ताण वाढत असून कधी एकदा पाऊस बरसतो आणि पाणीटंचाई संपुष्टात येते याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. (शहर वार्ताहर)