शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश, वकील, कर्मचाऱ्यांचे रक्तदान

By admin | Updated: April 15, 2017 00:15 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या औचित्याने जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले.

न्यायालयात आयोजन : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन यवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या औचित्याने जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. न्यायाधीशांसह वकील, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना आणि एकनील रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखडे होते. न्या. ए.एस. वाघमारे, न्या.पी.एस. खुने, न्या.मोहम्मद मोहिउद्दीन, न्या.पी.ए. वाघमारे, न्या. गरिमा बगरोदिया, विधीसेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव सचिन अग्रवाल, वकील संघाचे अध्यक्ष राजेन्द्र धात्रक, एकनील ब्लड बँकेचे व्यवस्थापक सागर तोडक, समुपदेशक आर. एन. पुरी उपस्थित होते. यावेळी न्या. अरविंद वानखडे म्हणाले, जिल्ह्यात दरवर्षी २२ हजार नागरिकांना रक्ताची आवश्यकता भासते. प्रत्यक्षात १६ हजार नागरिकांना रक्त उपलब्ध होते. जवळपास तीन ते चार हजार रुग्णांना रक्त उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत संघटनेने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एकनील ब्लड बँकेचे व्यवस्थापक सागर तोडक यांनी रक्ताची आवश्यकता सांगितली. संचालन प्रवीण राऊत, आभार बळीराम बेतवार यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यवतमाळ न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निरंजन होले, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष जावेद अली, बेलिफ संघटनेचे अध्यक्ष जी.एल. जाधव, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर जाधव, तृतीयश्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव प्रशांत देशमुख, तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे उपसचिव महंमद शफीक शेख आदींनी पुढाकार घेतला. (शहर वार्ताहर) लॉयर्स असोसिएशनचा अभिवादन कार्यक्रम डॉ. बाबासाहेब लॉयर्स असोसिएशनतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखडे होते. न्या.ए.एस. वाघमारे, न्या.पी.एस. खुने, न्या.मोहम्मद मोहिउद्दीन, न्या. पी.ए. वाघमारे, न्या.गरिमा बगरोदिया, विधीसेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव न्या. सचिन अग्रवाल, वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र धात्रक, लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा दिंडीलता कांबळे, अ‍ॅड. प्रगती वाणी, अ‍ॅड रवींद्र अलोणे, अ‍ॅड. राहुल घरडे, अ‍ॅड. योगीता ढोमणे, अ‍ॅड. सविता ढोक, अ‍ॅड. जयंत ठाकरे, अ‍ॅड. बिपीन ठाकरे, अ‍ॅड. इंगोले, अ‍ॅड आठवले, अ‍ॅड.मानकर, उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. रवींद्र अलोने यांनी तर आभार अ‍ॅड. जयसिंह चव्हाण यांनी मानले.