शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांचा कौटुंबिक स्रेहमिलन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:05 IST

जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी सायंकाळी महेश भवन येथे पत्रकारांच्या परिवारांसाठी कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी सायंकाळी महेश भवन येथे पत्रकारांच्या परिवारांसाठी कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला आणि मुलांसाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार न. मा. जोशी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसणकर, शिवसेनेचे शहर प्रमुख पराग पिंगळे, राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को आॅपरेटिव्ह पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक क्षितीज तायडे, शेतकरी वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिकंदर शहा, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन भागवते, सचिव अमोल शिंदे, जेष्ठ पत्रकार दिनेश गंधे मंचावर उपस्थित होते.पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. या प्रश्नमंजुषेचे संचलन नितीन भागवते यांनी केले. याप्रसंगी आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार दिनेश गंधे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न. मा. जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून सध्याच्या परिस्थितीत पत्रकारीतेची आवश्यकता आणि पत्रकारांना काम करण्यासाठी परिवारातील सदस्यांकडून मिळणारी मोलाची साथ यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिला पत्रकार आरती गंधे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पुरी यांनी, तर आभार भास्कर मेहरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता श्रमीक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.