शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईसाठी संयुक्त बैठक

By admin | Updated: November 1, 2014 01:17 IST

यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. विशेषत: पुसद, उमरखेड, दिग्रस या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. विशेषत: पुसद, उमरखेड, दिग्रस या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. या संभाव्य पाणीटंचाईसाठी यंत्रणेकडून आताच अहवाल मागविला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी पाच विभागांची संयुक्त बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. जलव्यवस्थापन समितीच्या नियोजित बैठकीपूर्वीच अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी अचूक असा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यासाठी यंत्रणेला विशेष सूचना दिल्या. पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, भूजल वैज्ञानिक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महात्मा गांधी रोजगार हमी योजना या विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. टंचाई आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येकांनी समन्वयाने काम करावे, यासाठी त्यांना एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. बऱ्याच गावांमध्ये सातत्याने पाणीटंचाई राहते. तेथील टंचाई कायमस्वरूपी मिटविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जुजबी उपाययोजना केल्यानंतर तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढणे शक्य असते. काही गावात तर मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही किरकोळ कारणाने पाणीपुरवठा योजना बंद असतात. अशा गावांमधील त्रुटी दूर करून तेथील कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यावर भर दिला जाणार आहे. हा आराखडा तयार करताना यात सर्वच बाबींचा समावेश करावा लागणार आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी कुठल्या उपाययोजना कराव्या याचे नियोजन सिंचन विभागाने करावे. त्या भागातील जमिनीचा स्तर कसा आहे. पाण्याची पातळी कितपत आहे याची माहिती भूजल वैज्ञानिकांकडून किरकोळ कामे करायची असल्यास रोजगार हमी योजनेतून आर्थिक तरतूद करता येते काय यावरही भर दिला जाणार आहे. या शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यांच्याकडूनही त्या बाबत सूचना मागविण्यात आल्या. अशा प्रकारे परिपूर्ण आराखडा तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे उन्हाळा लागण्यापूर्वी उपाययोजना करण्यासाठी पूर्व नियोजन जिल्हा परिषदेकडून केले जात आहे. यासाठी पाचही विभागाची संयुक्त बैठक अध्यक्ष आरती फुफाटे यांनी घेतली. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)