आर्णी : जिनिंग प्रेसिंगच्या मागील संचालक मंडळाने सर्वांना विचारात घेऊन ठराव घेतले नाही. त्यामुळे ते रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी एकमताने घेण्यात आला. नवीन ठरावानुसार कामकाज करण्यात यावे, असेही नमूद करण्यात आले. जिनिंग प्रेसिंगची आमसभा बाजार समिती यार्डमध्ये गुरुवारी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्य प्रशासक जी.पी. राठोड होते. यावेळी पूर्वीचे सर्व ठराव अमान्य करण्यात आले. जमीन विक्री करताना परवानगी न घेतल्याने मागील ठराव रद्द करण्यात आले. तसेच आजच्या ठरावात लेखा परीक्षणावर आक्षेप घेण्यात आला. विठ्ठल देशमुख, दिगांबर बुटले, डॉ.आर.के. चिंतावार, बंडू निलावार, वामन मुनगिनवार, श्याम लाड, रवींद्र नालमवार, नारायण चिंतावार, संदीप बुटले, दीपक बुटले, सुधाकर बेलगमवार, प्रवीण मुनगिनवार, प्रवीण शिंदे, उमेश कोठारी, राजू वीरखेडे, अरुण देशमुख, प्रकाश पाटील देशमुख, विलास देशमुख, भैयासाहेब मलनस, रोहिदास राठोड यांच्यासह पूर्वीचे कामावर असलेले मजूरवर्ग उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
जिनिंग-प्रेसिंगचे जुने सर्व ठराव रद्द
By admin | Updated: September 25, 2015 03:17 IST