शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:19 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले शोधनिबंध सादर केले. या परिषदेत सुमारे ४५ राष्ट्रांमधून संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले शोधनिबंध सादर केले. या परिषदेत सुमारे ४५ राष्ट्रांमधून संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.इंस्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त संस्थेतर्फे इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅन कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन सिस्टीम ही चौथी आंतरराष्ट्रीय परिषद नाण्यांग विद्यापीठ सिंगापूर येथे घेण्यात आली. यामध्ये जेडीआयइटीतर्फे विद्युत अभियांत्रिकी शाखेतील चौथ्या वर्षाचे विद्यार्थी प्रथमेश ज्ञानेश्वर उपाध्ये, श्रद्धा राजेंद्र तंबाखे, पल्लवी राम उमरे, माहिती तंत्रज्ञान शाखेचे नीलेश ज्ञानेश्वर गुल्हाने, श्रद्धा गणेशलाल जयस्वाल हे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी ‘स्मार्ट सोल्यूशन फॉर ट्राफिक कंट्रोल’ या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला.परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून नाण्यांग विद्यापीठाचे प्रा. पेरी शुम, राष्ट्रीय चुंग हसिंग विद्यापीठ तैवानचे प्रा. गु. चँग यांग, अल्बामा विद्यापीठ यूएसएचे प्रा. यांग सिओ लाभले होते.विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्तीजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाची उत्कृष्ट अभियंता आणि संशोधक घडविणारे महाविद्यालय अशी ओळख आहे. प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. विदेशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. शिवाय आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते.