यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना अकोला येथे झालेल्या राष्ट्रीय शोध परिषदेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात हिमांशू सांडे आणि नाहीद शेख यांचा समावेश आहे.‘टेकनोथलन-२०१५’ या शोधनिबंध परिषदेत हिमांशू सांडे हिने ‘इफेक्ट आॅफ लेंथ आॅन रेनफोरसमेंट आॅफ बांबू फायबर आॅन सिमेंट कंपोझीट’ हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. हाँगकाँग येथे आॅगस्ट २०१४ मध्ये झालेल्या पाचव्या एशियाई प्रोटेक्टींग क्लोदिंग कॉन्फरन्समध्ये हिमांशूने हा शोधनिबंध सादर केला होता. द्वितीय वर्ष टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाची नाहीद शेख हिने इचलकरंजी येथे झालेल्या ‘टेक्सव्हिजन’ या शोध परिषदेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. ‘टेस्टींग आॅफ इकोलॉजीकल अॅस्पेक्ट’ या विषयावर शोधनिबंध सादर करत द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. या परिषदेसाठी या दोनही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे शिष्यवृत्ती देण्यात आली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना वस्त्रोद्योग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. सुजीत गुल्हाने, प्रा. दीपक उबरहांडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, अनंत इंगळेकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, श्याम केळकर, विनय चौरे आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)
‘जेडीआयईटी’च्या हिमांशू व नाहीदला राष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत पुरस्कार
By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST