शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

‘जेडीआयईटी’मध्ये स्फिलाटा-१६ जल्लोषात

By admin | Updated: March 9, 2016 00:25 IST

पेपर प्रेझेंटेशन, विविध विषयांवर राष्ट्रीय परिसंवाद, गारमेंट व अ‍ॅसेसरिज डिझायनिंग स्पर्धा, प्रदर्शन आणि फॅशन शो आदी ...

विविध स्पर्धा : एसएनडीटी मुंबई फॅशन शोचे विजेते, अ‍ॅक्सेसरिज डिझायनिंगमध्ये अमरावतीच्या विद्यार्थिनीची बाजीयवतमाळ : पेपर प्रेझेंटेशन, विविध विषयांवर राष्ट्रीय परिसंवाद, गारमेंट व अ‍ॅसेसरिज डिझायनिंग स्पर्धा, प्रदर्शन आणि फॅशन शो आदी कार्यक्रमांच्या आयोजनाने ‘स्फिलाटा-१६’ जल्लोषात पार पडला. स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरिंग टेक्सटाईल विभागातर्फे आयोजित या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. फॅशन शोच्या प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मुंबई येथील एसएनडीटी महाविद्यालयाला ‘एव्हीएन वर्ड’ या थीमसाठी देण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार ख्वाजा बेग, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या प्रा. माया कांगणे, टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, स्फिलाटाचे समन्वयक प्रा. अजय राठोड, विद्यार्थी प्रतिनिधी बिक्रमजित सिंग, शाहनवाज बेग आदी मंचावर उपस्थित होते. या परिषदेत गुंटूर (आंध्रप्रदेश), कोर्इंबतूर, तामिळनाडू, मुंबई, शिरपूर, धुळे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, नागपूर, इचलकरंजी, अमरावती, अकोला, चिखली आदी ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. फॅशन शोमध्ये विविध महाविद्यालयातील ६०० च्यावर स्पर्धकांनी सहभाग घेतला. विविध विषयांवर आधारित स्वत: डिझायनिंग केलेले आणि स्पर्धेसाठी खास बनविलेला पोषाखात स्पर्धक सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून फॅशन शोसाठी प्रा. संदीप सोनी, प्रा. माया कांगणे, गारमेंट व अ‍ॅसेसरिज डिझायनिंगसाठी प्रा. चारूशीला गरत, प्रा. अनघा गाढवे, पेपर प्रेझेंटेशनसाठी प्रा. रेणूका मुळे, स्वप्ना जवादे, रिअल मॉडेल ड्रेपिंगसाठी प्रा. कपिल वारकरी, टेक्सटाईल उद्योजक प्रियंका सरया लाभले होते. पारितोषिक वितरण संस्थेचे सचिव किशोर दर्डा आणि लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते झाले. फॅशन शो स्पर्धेत द्वितीय पारितोषिक नागपूर येथील आयआयडीटी महाविद्यालयाला ‘ग्लो ग्लाम विथ बल्ब’ या थीमसाठी, तर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक इचलकरंजी येथील डीकेटीईला ‘ड्रिमी वर्ल्ड’ या थीमसाठी देण्यात आले. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ, आयएफए अमरावती, वर्षा पाटील जळगाव, आयएनआयएफडी जळगाव या महाविद्यालयांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. गारमेंट्स मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमरावती येथील गव्हर्नमेंट विदर्भ महाविद्यालयाच्या अनुज पाथोडेला मिळाले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सायबर इंस्टिट्यूट कोल्हापूर येथील कांता शर्मा, तर यवतमाळ येथील महिला शासकीय तंत्रनिकेतनच्या संपदा सालकर हिला तृतीय बक्षीस मिळाले. पेपर प्रेझेंटेशनमध्ये व्हीजेटीआय मुंबईचे अश्विनी अग्रवाल व समीर मेमन यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. डीकेटीई इचलकरंजीचे प्रकाश चौधरी व साहिल चव्हाण द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले. इंडियन फॅशन अकॅडमी अमरावतीच्या आरती दयमा हिने अ‍ॅसेसरिज डिझायनिंगचे प्रथम, तर यवतमाळच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनची मृणाल गावंडे हिला द्वितीय बक्षीस मिळाले. रिअल मॉडेल ड्रेपिंगमध्ये प्रथम क्रमांक एसएनडीटी चर्च गेट मुंबईच्या मुदसरिया शेख, पूजा हरिया, फिरदास खान यांना मिळाला. यवतमाळच्या महिला तंत्रनिकेतनच्या साक्षी यादव, मंजूषा काबळे, अक्षदा पर्बत या विद्यार्थिनी बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक मॅग सॉल्वीस कोर्इंबतूर, एटीई एंटरप्राईजेस मुंबई, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी नांदेड, दि यवतमाळ अर्बन को-आॅप. बँक, मॅक मोटर्स यवतमाळ, गोली वडापाव यवतमाळ, शो आॅफ यवतमाळ, सिकवेल फोर्ड यवतमाळ, समीर व्हेरायटिज यवतमाळ, असेट कम्प्यूटर यवतमाळ, एलआयसी यवतमाळ, आदिल मोबाईल शॉप यवतमाळ, कॉलेज कट्टा यवतमाळ हे होते. स्पर्धा आणि परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी ‘टेसा’चे समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. दीपक उबरहांडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, स्फिलाटा-१६ चे विद्यार्थी प्रतिनिधी बिक्रमजित सिंग, शाहनवाज बेग, सुरभी परळीकर, मयूर उजवणे, ऋतुजा भोरे, गजानन कदम, दीपाली राठोड, पूजा महल्ले, देवयानी धांदे, सपना बन, नगमा खान, श्याम शेंदूरकर, प्रियंका सानप, उमेश पाटील, तेजस कापसे, विशाल टेकाडे, धनश्री तल्लन, दीपाली नाकतोडे, तृप्ती पाठक, गजानन कदम, युगा बोबडे, सागर साळुंके, श्याम शेंदरकर, प्रणय ढगे, रवी कटारे, हर्षल सम्रीत, अशर खान, अंकित डेरे, प्रियंका सानप, नितेश धारिया, विशाल रोकडे, लोमेश नारखेडे, दीपाली मुंडलीक, शुभम अवझाडे आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)