यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील शॉम इंडोफॅब प्रा.लि. या कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूतून निवड झाली आहे. यात बिपीन पांडे, मयूर उजवणे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली असून वार्षिक २.४ लाख पॅकेज घोषित करण्यात आले आहे. त्यांना वस्त्रोद्योग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, टी अँड पी प्रमुख प्रा. राहुल फाळके, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. दीपक उबरहंडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, अनंत इंगळेकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, श्याम केळकर, विनय चौरे, मनोज शेंदरे आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)
‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची शॉम इंडोफॅब कंपनीत निवड
By admin | Updated: February 20, 2016 00:14 IST