ठळक मुद्देयेथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम शाळेत पोळा हा सण साजरा करण्यात आला.
यवतमाळ - येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम शाळेत पोळा हा सण साजरा करण्यात आला. शेतकरी बांधव वर्षभर शेतात राबतात आणि त्यांच्या कष्टात त्यांचे बैल हे त्यांचे खरे मित्र बनून साथ देतात. या बैलांच्या कष्टाचा मान म्हणून हा बैल पोळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये पशूप्रेम जागृत करण्यासाठी शाळेच्या प्रांगणात शेतीचा देखावा साकारण्यात येऊन प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शेतकºयाच्या पारंपरिक वेशभूषेत आपली सजवलेली बैलं या ठिकाणी आणले होते. बैलांची पूजा करून पोळा सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.