शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीत आज विदर्भस्तरीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 22:51 IST

येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विदर्भातील खासगी व्यवस्थापनाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोरील अडचणी व समस्या मांडण्यासाठी विदर्भस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्षणमंत्री विनोद तावडेंची उपस्थिती : ‘युफोरिया-१८’ स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विदर्भातील खासगी व्यवस्थापनाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोरील अडचणी व समस्या मांडण्यासाठी विदर्भस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहे. विदर्भातील ८५ महाविद्यालयांचे प्रतिनिधी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडणार आहेत. तसेच वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया-१८’चे आयोजन २० ते २२ जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे.बदलत्या काळानुसार शिक्षणाचा दर्जा वाढविणे, अभ्यासक्रमाचा स्तर उंचाविणे, व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणाली रुजू करणे आणि बेरोजगारीचा निर्देशांक कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विदर्भातील सर्व ८५ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्यवस्थापन व प्राचार्यांचे चर्चासत्र आयोजित आहे. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर येणाºया अडीअडचणी जाणून घेतील. तसेच मार्गदर्शन करणार आहेत.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात २० ते २२ जानेवारीपर्यंत ‘युफोरिया-१८’ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ.डी.व्ही. जाधव उपस्थित राहणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे अभियांत्रिकी स्नातक असून त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत आत्मविश्वास उंचावणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे सचिव किशोर दर्डा, ‘जेडीआयईटी’चे प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, चर्चासत्र समन्वयक राजेश संभे, स्रेहसंमेलन आयोजन समितीचे समन्वयक डॉ.पंकज पंडित, डॉ.अतुल राऊत यांनी केले आहे.