शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे शहिदांच्या कुटुंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:41 IST

येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आशीर्वाद सोहळा’ पार पडला. यावेळी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील दोन जवानांच्या कुटुंबांना जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. तसेच तातडीने ही मदत शासकीय वेबसाईटवरून पोहोचविण्यातही आली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा आशीर्वाद सोहळा : यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शहिदांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आशीर्वाद सोहळा’ पार पडला. यावेळी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील दोन जवानांच्या कुटुंबांना जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. तसेच तातडीने ही मदत शासकीय वेबसाईटवरून पोहोचविण्यातही आली.यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये (वायपीएस) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ (आशीर्वाद सोहळा) आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांसह मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांसह सर्वच मान्यवरांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला.शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना म्हणाले की, आपण सर्वांनी या कठीण प्रसंगात शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यांना शक्य त्या पद्धतीने मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुलवामातील घटनेत महाराष्टÑातील दोन जवान शहीद झाले. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील नितीन शिवाजी राठोड आणि मलकापूर येथील संजय राजपूत या शहीद जवानांच्या परिवारांना जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रत्येकी २५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा यावेळी किशोर दर्डा यांनी केली. सर्व मान्यवर तसेच शिक्षकांना शहिदांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘भारत के वीर’ या वेबसाईटची माहिती दिली. या लिंकच्या आधारे सर्वांनी शहिदांच्या कुटुंबीयांना शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.