शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करणारा आरोपी अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:01 IST

तालुक्यातील मुर्धोणी येथे मोलमजुरीसाठी आलेल्या एका इसमाने त्याच्या पत्नीचा दगडाने ठेचून खून केला होता. घटनेपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर शनिवारी जेरबंद करण्यात वणी पोलिसांना यश आले.

ठळक मुद्देंमुर्धोणीतील खून प्रकरण : तीन किलोमीटरपर्यंत पोलिसांनी केला पाठलाग

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील मुर्धोणी येथे मोलमजुरीसाठी आलेल्या एका इसमाने त्याच्या पत्नीचा दगडाने ठेचून खून केला होता. घटनेपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर शनिवारी जेरबंद करण्यात वणी पोलिसांना यश आले.सूरज गेंदा भवेदी असे आरोपीचे नाव आहे. तो व त्याची पत्नी सोनावती काही दिवसांपूर्वी मुर्धोणी येथे मोलमजुरीसाठी आले होते. ४ मार्च रोजी महाशिवरात्रीला सोनावती शिरपूर येथे कैलास शिखर देवस्थानात दर्शनासाठी गेली होती. परत मुर्धोणीला आल्यानंतर सूरज व सोनावती या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादात सूरजने फरशी व विटेच्या तुकड्याने सोनावतीच्या पोटावर, छातीवर व कमरेवर जबर मारहाण केली. या मारहाणीत सोनावती जागीच मरण पावली. घटनेनंतर सूरज जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. गेल्या आठवडाभरापासून वणी पोलीस त्याच्या मागावर होते. तो मध्यप्रदेशातील त्याच्या गावी गेला असल्याच्या अंदाजावरून पोलिसांचे एक पथक तेथेही जाऊन आले. परंतु सूरज हाती लागला नाही. दरम्यान, शनिवारी तो घोन्सा मार्गावरील लिलावती ले-आऊटसमोरील जंगल परिसरात झुडूपाच्या आधाराने लपून असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली. माहितीवरून डी.बी.पथकाने संबंधित ठिकाण गाठले असता, पोलीस दिसताच सूरजने तेथून पुन्हा जंगलाकडे पळ काढला. डी.बी.पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन किलोमीटर सूरजचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक काकडे, डी.बी.पथक कर्मचारी सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहोडे, इमरान खान, नितीन सलाम, दीपक वांड्रस्कर, अमित पोयाम, अजय शेंडे आदींनी पार पाडली.

टॅग्स :MurderखूनArrestअटक