शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतार्इंचे भरपावसात जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:27 IST

मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडीतार्इंनी यवतमाळच्या बसस्थानक चौकात गुरुवारी दुपारी जेलभरो आंदोलन केले.

ठळक मुद्देभरपावसातही तार्इंनी बसस्थानक चौकात ठिय्या दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडीतार्इंनी यवतमाळच्या बसस्थानक चौकात गुरुवारी दुपारी जेलभरो आंदोलन केले. भरपावसातही तार्इंनी बसस्थानक चौकात ठिय्या दिला. यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली, तर आंदोलकांच्या मोठ्या संख्येने अटकेसाठी पोलिसांची वाहने अपुरी पडली. विविध घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून गेला होता.मानधनवाढीचा मुद्दा घेऊन अंगणवाडीतार्इंच्या विविध संघटना संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरल्या आहे. ११ सप्टेंबरपासून त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. उलट अंगणवाडीचे कामकाज ग्रामपंचायत अथवा आशा स्वयंसेविकेकडे सोपविण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील अंगणवाडीताई दुपारी १२ वाजता बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र आल्या. त्यानंतर संपूर्ण बसस्थानक चौकात अंगणवाडीतार्इंनी ठिय्या दिला. यामुळे चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, पावसाची जोरदार सर कोसळली. परंतु एकही अंगणवाडीताई जागांवरून हटायला तयार नव्हती. पाऊस ओसरताच पोलिसांनी स्थानबद्धची कारवाई सुरू केली. मात्र दोनच लॉरी असल्याने स्थानबद्ध करण्यासाठी अनेक येरझारा माराव्या लागल्या. तोपर्यंत बसस्थानक चौकातील वाहतूक ठप्पच होती. आंदोलकांना स्थानबद्ध करण्यासाठी बराच वेळ गेला.आंदोलनाचे नेतृत्व उषाताई डंभारे, गुलाब उम्रतकर, रचना जाधव, पल्लवी रामटेके, कांताबाई मोरे, जया सावळकर, प्रणिता राजूरकर, छाया दांडेकर, सविता कट्यारमल, अनिता कुळकर्णी, विजया सांगळे, रेखा लांडे, निर्मला मादेरकर, विजया जाधव, रमा गजभार, बेबी मोडक, दिवाकर नागापुरे, संजय भालेराव आदींनी केले.