शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जयहिंद क्रीडा मंडळ व हनुमान व्यायाम शाळा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:27 IST

येथील वीर सावरकर मैदानावर सोमवारी रात्री रंगलेल्या सीएम चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील अंतिम सामन्यात जयहिंद क्रीडा मंडळ संघाने सुभाष क्रीडा मंडळ वडगावचा २८ विरूद्ध २ असा तब्बल २६ गुणांनी दणदणीत पराभव करून अव्वल स्थान पटकाविले. महिला गटात हनुमान व्यायाम शाळा यवतमाळ संघाने प्रथम, तर मातोश्री कन्या विद्यालय संघाने दुसरे स्थान प्राप्त केले.

ठळक मुद्देसीएम चषक कबड्डी स्पर्धा : पुरुष व महिला गटातील सामने, शनिवारी बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वीर सावरकर मैदानावर सोमवारी रात्री रंगलेल्या सीएम चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील अंतिम सामन्यात जयहिंद क्रीडा मंडळ संघाने सुभाष क्रीडा मंडळ वडगावचा २८ विरूद्ध २ असा तब्बल २६ गुणांनी दणदणीत पराभव करून अव्वल स्थान पटकाविले. महिला गटात हनुमान व्यायाम शाळा यवतमाळ संघाने प्रथम, तर मातोश्री कन्या विद्यालय संघाने दुसरे स्थान प्राप्त केले.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने यवतमाळ विधानसभा अंतर्गत ७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत सीएम चषक क्रीडा व कला महोत्सव आयोजित आहे. या अंतर्गत कबड्डी स्पर्धेत ६३ संघांनी सहभाग नोंदविला. पालकमंत्री मदन येरावार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या उपस्थितीत पुरुष गटातील अंतिम सामना खेळविण्यात आला. जयहिंद क्रीडा मंडळाने एकतर्फी झालेल्या या सामन्यात सुभाष क्रीडा मंडळाचा २६ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे यशवंत मोकलकर, जय मानकर, राहुल मडावी, नीकेश तारक, आशीष आत्राम, आकाश अतकरी, रवींद्र जाधव यांनी उत्कृष्ट खेळ केला.तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इंडियन आर्मी यावली संघाने कमलेश्वर क्रीडा मंडळ लोहारा संघाचा पराभव केला. महिला गटात हनुमान व्यायाम शाळा यवतमाळ संघाने मातोश्री कन्या विद्यालय संघाचा पराभव करीत प्रथम स्थान प्राप्त केले.स्पर्धेचे संयोजक म्हणून अजय राऊत यांनी जबाबदारी सांभाळली. तांत्रिक पंच म्हणून ताराचंद चव्हाण, वाय. पठाण, अजय कोलारकर, प्रा. अनिल फेंडर, पप्पू रामपूरकर, मनोज येंडे, मोहन चव्हाण यांनी काम पाहिले. विजेत्या संघांना ८ डिसेंबर रोजी समता मैदानावर होणाºया कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे.