शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवड्यात असे झाले मटक्याचे ‘स्टिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:11 IST

जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग आॅपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले. आठवडीबाजारात खुलेआम मटका जुगार सुरू होता. राज्यमंत्री दर्जाची व्यक्ती आपल्या बाजूला बसून आहे, याचीही जाणीव जुगाऱ्यांना नव्हती.

ठळक मुद्देआठवडी बाजारातील प्रकार : शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या समोरच जुगाराचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग आॅपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले. आठवडीबाजारात खुलेआम मटका जुगार सुरू होता. राज्यमंत्री दर्जाची व्यक्ती आपल्या बाजूला बसून आहे, याचीही जाणीव जुगाऱ्यांना नव्हती.जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या आर्थिक अडचणीत मटका व जुगार भर घालत आहे. यामुळेच अनेक जण आत्महत्येकडे वळतात. नेमका काय प्रकार आहे याचा छडा लावण्यासाठी खुद्द किशोर तिवारी यांनी स्वत: स्टिंग आॅपरेशन केले. पांढरकवडा येथील आठवडी बाजार परिसरात खुलेआम मटका, जुगार आणि चेंगळ हा प्रकार सुरू होता. अनेक जण पैसे लावण्यासाठी गर्दी करून होते. या गर्दीतच किशोर तिवारी स्वत: डाव लावणाऱ्याच्या बाजूला बसले. पोलिसांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कष्टाने कमावलेला पैसा या जुगारात उधळला जातो. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत असल्याचे तिवारी म्हणाले.मटका, जुगाराला आमदाराचा आशीर्वादकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकसभा मतदारसंघात पांढरकवडा शहर येते. मंत्र्यांनी स्थानिक पोलिसांना मटका, जुगार हद्दपार करण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीसुद्धा मटका, जुगार आढळल्यास उपमहासंचालक दर्जाच्या अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. मात्र खुलेआम मटका जुगार सुरू आहे. पांढरकवडा येथे तर स्थानिक आमदाराने मटका जुगाºयांची बैठक घेऊन धंदा सुरू करण्यास सांगितल्याचा आरोप तिवारी यांनी केला.

टॅग्स :Kishor Tiwariकिशोर तिवारीYavatmalयवतमाळ