शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सभागृहाबाहेर पेटला कचऱ्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:34 IST

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच मंगळवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटविला. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक सभेला दांडी मारत असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला.

ठळक मुद्देकाळे झेंडे दाखविले : यवतमाळ नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या अनागोंदीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच मंगळवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटविला. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक सभेला दांडी मारत असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. तर एका नगरसेवकाने चक्क आपल्या प्रभागातील कचरा घंटागाडीत आणून थेट पालिकेसमोरच रिचविला. त्यामुळे पालिकेची सभा सभागृहाबाहेर वादळी ठरली.मंगळवारी यवतमाळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा होती. सभेत भूमीगत गटार, कचरा आणि इतर महत्त्वाचे विषय चर्चेला असताना मुख्याधिकारी अनिल अडागळे अनुपस्थित होते. त्यामुळे नगरसेवक भडकले. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत प्रहारने सभेवर बहिष्कार टाकला. तर सभागृहातील सदस्यांनी विषयपत्रिकेत असलेल्या आठही विषयांना मंजुरी दिली. तर दुसरीकडे विरोधकांनी सभागृहाबाहेर काळे झेंडे दाखविले आणि कचरा भरलेली घंटागाडी रिती केली.अमृत योजनेतील भूमीगत गटार योजनेसाठी आलेल्या जादा दराच्या निविदेला मंगळवारी सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी संमती दर्शविली. सभागृहात या ठरावाला मंजुरी देण्यात आली. सत्ताधारी पक्षाच्या या अफलातून कारभाराविरोधात आवाज उठवित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.संपूर्ण शहरासह हद्दवाढ क्षेत्रातही कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. असे असतानाही कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेने आणलेली वाहने धुळखात पडून आहे. राजकारणाच्या श्रेयवादातून दिवाळीला या वाहनांचे उद्घाटन घेण्यात आले. विरोधीपक्षाच्या नगरसेवकांना याची कुठलीही माहिती दिली गेली नाही. इतकेच नव्हेतर, या वाहनांना आरटीओ कार्यालयाने दंड ठोठावला आहे. नगरपालिकेला तो भरावा लागणार आहे. हा प्रकार गंभीर असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे गटनेते चंदू चौधरी, नगरसेवक बबलू देशमुख, वैशाली सवई, पंकज मुंदे, दिनेश गोगरकर, रजनी देवकते यांनी काळे झेंडे दाखविले. यावेळी नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला.प्रभागातला कचरा पालिकेपुढे रिचविलाप्रहारचे नगरसेवक नितीन मिर्झापुुरे यांनी कचऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवित आपल्या प्रभागातील कचराच नगरपरिषदेच्या समोर आणून टाकला. यावेळी नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात रोष व्यक्त केला. तर सर्व नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवित जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका