शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीचा विषय बारगळला

By admin | Updated: June 11, 2014 23:39 IST

वणी शहराच्या हद्दवाढीचा विषय मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड विरोधानंतर बारगळला. त्यामुळे नगराध्यक्षांच्या ‘अजेंड्या’वरच पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरू आहे.

सर्वसाधारण सभा : नगराध्यक्षांच्या छुप्या अजेंंड्यावर फिरले पाणीवणी : वणी शहराच्या हद्दवाढीचा विषय मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड विरोधानंतर बारगळला. त्यामुळे नगराध्यक्षांच्या ‘अजेंड्या’वरच पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरू आहे.नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा काल मंगळवारी पार पडली. या सभेत प्रमुख तीन विषय होते. त्यात कंट्रोल मॅप, शहराची हद्दवाढ आणि विकास कामे सुचविणे, या विषयांचा समावेश होता. सोबतच कंत्राटदारांची अनामत रक्कम परत करण्याचाही विषय होता. वणी शहरासभोवताल काही परिसर आहे. त्यात काही ठिकाणी वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र त्यापैकी काही वसाहती ना नगरपरिषद क्षेत्रात मोडतात, ना लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोडतात. परिणामी अशा वसाहतींकडे ग्रामपंचायती आणि नगरपरिषदेचे दुर्लक्ष होते. तेथे विकास कामे करता येत नाही. त्यामुळे शहराची हद्दवाढ करून अशा क्षेत्रांना नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विषय होता. नगरपरिषद क्षेत्राची हद्दवाढ करताना शहरासभोवतालच्या अशा वसाहतींचा समावेश करतानाच काही इतर परिसराचाही हद्दवाढीत नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्याचा ‘घाट’ घालण्यात आला होता, अशी माहिती आहे. यात काही ठिकाणी आता ले-आउटची निर्मिती झाली आहे. मात्र सदर ले-आउट तूर्तास नगरपरिषद हद्दीत मोडत नाही. त्यामुळे त्यांना नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठीच हा हद्दवाढीचा विषय खुद्द नगराध्यक्षांनी उचलून धरल्याची माहिती आहे. मात्र सभेत विरोधकांसह काही सत्ताधारी सदस्यांनीही या हद्दवाढीला विरोध दर्शविल्याने अखेर हा विषय बारगळला.शहराचा आकार दिवसेंदिवस वाढत असून आधीच शहरवासीयांना अनेक मूलभूत सुविधा मिळत नाही. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. काही भागातील नागरिकांना अद्यापही बोअरवेलचेच पाणी पुरविले जाते. शहरातील अनेक ले-आउटही अद्याप पूर्णपणे विकसित झाले नाही. तसेच शहरालगतच्या कोणत्याही ग्रामपंचायतीने हद्दवाढ करण्याचा प्रस्तावही दिला नाही. असे असतानाही सर्वसाधारण सभेत हद्दवाढीचा विषय उपस्थित झाला, हे विशेष. त्यामुळे ही हद्दवाढ भू माफियांसाठी करण्यात येत आहे काय, असा संतप्त प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित केला. याच सभेत नगरपरिषदेच्या विविध कामांसाठी करारनामे करणाऱ्या काही कंत्राटदारांना अनामत रक्कम परत करण्याचाही विषय होता. तथापि काही कंत्राटदारांनी करारनामे करूनही संबंधित काम पूर्ण केले नसल्यामुळे त्यांना अनामत रक्कम परत करू नये, अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली. करारनामे करूनही कंत्राटदारांनी कामे न केल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त करावी, अशी त्यांची भूमिका होती. विरोध प्रबळ असल्याने हा विषयही काल मार्गी लागू शकला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)