शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

आयपीएल क्रिकेट स्पर्धा : लिलावात १० लाखांची बोली

By admin | Updated: February 7, 2016 00:35 IST

येथील फिरकी गोलंदाज अक्षय किसन कर्णेवार याची आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघात निवड झाली आहे.

नरेश मानकर पांढरकवडायेथील फिरकी गोलंदाज अक्षय किसन कर्णेवार याची आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघात निवड झाली आहे. या संघाच्या मालकाने त्याला १० लाखांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे.गेल्या काही वर्षांपासून आयपीएल स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत देशातील विविध संघ सहभागी होतात. या संघांमध्ये देशी क्रिकेट खेळाडूंसोबतच विदेशी खेळाडूंचाही समावेश असतो. सन २०१६ च्या सत्रात या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. यात रॉयल चॅलेंजर बेंगलुरू संघाने १० लाखांची बोली लावून येथील दोन्ही हाताने फिरकी गोलंदाजी करणारा अक्षय कर्णेवार याला आपल्या संघात घेतले आहे. विशेष म्हणजे अक्षय दोन्ही हातांनी गोलंदाजी करीत असल्याने त्याच्यासाठी ही स्पर्धा मोठी संधी ठरण्याची शक्यता आहे. क्रीडानगरी म्हणून पांढरकवड्याचा उल्लेख क्रीडा जगतात नेहमी केला जातो. आता क्रिकेट या आंतरराष्ट्रीय खेळातही पांढरकवड्याच्या अक्षय किसन कर्णेवार या युवकाने शहराचे नाव चमकविले आहे. आता त्याची आयपीएल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येथील के.इ.एस. हायस्कूलच्या क्रीडांगणावर तो रोज क्रिकेट खेळायचा. त्याला बाळू नवघरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सततचा सराव आणि मार्गदर्शनातून अक्षय कर्णेवार याने ही भरारी घेतली आहे. दोन्ही हाताने फिरकी गोलंदाजीमुंबई येथील वानखडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० सैय्यद मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट सामन्यात विदर्भाकडून त्याने गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने बडोदा चमूविरुध्द झालेल्या सामन्यात एका ओव्हरमधील सहाही चेंडू हात बदलवून टाकले होते. त्यामुळे फलंदाज त्रस्त झाले होते. त्याच्या या ‘रँडम बॉलिंग स्टाईल’ने भारतीय क्रिकेट जगतातील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. क्रिकेटपटू बनण्याची माझा भाऊ केशव याची इच्छा होती. परंतु परिस्थितीमुळे तो बनू शकलो नाही. पुतण्या अक्षयने तरी क्रिकेट जगतात आपले नाव रोशन करावे अशी त्याच्या काकांची इच्छा होती. ती आता या निवडीमुळे पूर्ण झाली आहे. - किसन कर्णेवार(क्रिकेटपटू अक्षयचे वडील)सुभाष मंडळाचा अनिल ‘प्रो-कबड्डी’तयवतमाळ - येथील वडगावस्थित सुभाष क्रीडा मंडळाचा अव्वल कबड्डीपटू अनिल श्रीराम निंबोळकर याची प्रो-कबड्डीमध्ये वर्णी लागली आहे. त्याच्यावर १२ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. तो इंडियन बॉर्डर पोलीस संघातून खेळतो आहे. अनिल हा बुलडाणा जिल्ह्याच्या निकमानपूरचा रहिवासी आहे. त्याचे सातवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळात झाले. त्याच्यातील क्रीडा गुण ओळखून सुभाष क्रीडा मंडळाने १९९५ पासून त्याचा शिक्षण, निवासाचा खर्च केला. सुभाष क्रीडा मंडळाचा उत्तम कबड्डीपटू म्हणून त्याने नावलौकिक मिळविला. त्याने पाच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा गाजविल्या आहे. तो दिल्ली पोलीसचा जवान आहे.