शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा मोबदला शेतीतच गुंतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 21:59 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ करीता शेतकऱ्यांनी कोणतेही आंदोलन न करता विकासात आपले योगदान दिले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण, रस्त्यासाठी भूसंपादन

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ करीता शेतकऱ्यांनी कोणतेही आंदोलन न करता विकासात आपले योगदान दिले आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वखुशीने जमिनी दिल्या. शासनानेसुध्दा चांगला मोबदला दिला आहे. अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यातून शेतीमध्ये गुंतवणूक केली तर अधिक चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शेतकऱ्यांना धनादेश वाटप करताना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रशांत मेंढे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ उपस्थित होते.अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग ३६१ करीता केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतर निधी देण्यात आला. सर्वांना भरीव व चांगला मोबदला देण्यात आला आहे. या पैशाचे योग्य नियोजन करा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रकांत बारी, महेंद्र देवाणी, मोहम्मद मुजीब मोहम्मद सलीम, कैलाश ठोंबरे, महेंद्र ठोंबरे, देविदास कृपलानी, अभय दुबे, प्रकाश टेकडे, नीलेश राठी आदींना धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच चिचघाट येथील वनिता दिलीप गायकवाड आणि कृष्णापूर येथील सविता रामसिंग जाधव या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश देण्यात आला.