शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचे भाव घसरल्याने गुंतवणूकदार अडचणीत

By admin | Updated: June 8, 2014 00:12 IST

सोने खरेदीत गुंतवणूक करणार्‍यांची संख्या पुसद तालुक्यात मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु सध्यस्थिती गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये दररोज होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चेहरे पडले आहे.

पुसद : सोने खरेदीत गुंतवणूक करणार्‍यांची संख्या पुसद तालुक्यात मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु सध्यस्थिती गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये दररोज होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चेहरे पडले आहे. या वेळी खरिपाच्या लागवडीचा हंगाम जवळ येऊन ठेपला असला तरी शेतकरी हे आपल्याकडे असलेले सोने मोडीसाठी सराफा बाजारात येत नसल्याने त्यातून मिळणारा फायदा सराफांना होत असल्याचे आज तरी दिसून येत नाही. सोन्यात गुंतवणूक करून आपल्या पैशात वाढ करण्याची हौस अनेकांना असते. अनेक जण आपली संपत्ती सोने खरेदी करून अधिक वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. गेल्या काही वर्षांपूर्वी सोन्याचा भाव सतत वाढत होता. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला मोठा आर्थिक लाभ होऊ शकेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना होती. त्यामुळे त्यांनी सोने खरेदीत मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. परंतु केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आणि जागतिक बाजारातील घडामोडीनंतर सोन्याच्या भावामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. याचा धसका गुंतवणूकदारांनी घेतला आहे. सध्या २७ हजार २00 रुपये प्रति तोळ्यापर्यंत सोन्याचे भाव घसरले आहे. चांदीच्या भावातही घसरण आली आहे. सातत्याने सोन्या-चांदीच्या भावामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चेहरेही पडले आहेत. सोने खरेदीदारांसाठी मात्र सध्या चांगले दिवस आहे. विशेष म्हणजे या वेळी शेतकरी आपल्याकडे असलेले सोने हे खरीप हंगामाची पेरणी जवळ आली असतानाही मोडत नसल्याने मोडीतून मिळणारा फायदाही सराफा व्यापार्‍यांना मिळत नसल्याची स्थिती आहे. यावर्षी अतवृष्टी गारपिटीमुळे संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली. या नुकसानीची जी काही भरपाई शेतकर्‍यांना शासनाकडून मिळाली आहे. त्यामध्ये काही कर्जाची रक्कम टाकून खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांनी तयारी चालविली आहे. विनाकारण कमी भावात सोने विकण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाही. एरवी शेतकरीही आपल्याकडे शेतीमाल आल्यानंतर त्याच्या विक्रीतून दागिने खरेदी करतात आणि पेरणीच्या हंगामात तिच दागिने विक्रीस काढतात. या वेळी दागिने मोडण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सराफा व्यापार्‍यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)