शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदार पोलीस ठाण्यावर

By admin | Updated: July 8, 2014 23:40 IST

ठेवी परत मिळाव्या, यासाठी येथील महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांनी मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यावर धडक दिली. वारंवार चर्चा करूनही रक्कम मिळत नसल्याने खातेदारांनी

राळेगावातील प्रकार : महिला पतसंस्थेच्या ठेवी परत देण्याची मागणी राळेगाव : ठेवी परत मिळाव्या, यासाठी येथील महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांनी मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यावर धडक दिली. वारंवार चर्चा करूनही रक्कम मिळत नसल्याने खातेदारांनी या पतसंस्थेच्या व्यवस्थापनाविषयी रोष व्यक्त करीत नारेबाजी केली. पोलीस ठाण्याच्या आवारात हजारो नागरिकांची गर्दी झाली होती. या पतसंस्थेने गेली काही दिवसांपासून गुंतवणुकीची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. दरम्यान तहसीलवर मोर्चा नेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी अंकेक्षकामार्फत लेखी परीक्षण करून रक्कम देण्याविषयी कारवाई करण्याचे आश्वासन सहायक निबंधकांनी खातेदारांना दिले होते. प्रत्यक्षात याची पूर्तता झाली नाही. दरम्यान पतसंस्था अध्यक्षांना घेराव घालण्यात आला. त्यावेळी सोमवार ७ जुलै रोजी रक्कम मिळण्याविषयी लेखी घेण्यात आले. यानुसार खातेदार सोमवारी कार्यालयावर धडकले. त्यावेळी पदाधिकारी अथवा कर्मचारीही पतसंस्थेत नव्हते. संस्थेच्या अध्यक्ष कापसी या गावी असल्याचे समजताच खातेदार तेथे पोहोचले. तेथून राळेगावला आले. याठिकाणी दिवसभर चर्चा झाल्यानंतरही पैसे देण्याविषयी ठोस निर्णय झाला नाही.मंगळवार ८ जुलैला सकाळपासून संस्थेच्या अध्यक्ष लताताई बनकर आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र निर्णय झाला नसल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. याठिकाणी तहसीलदार सुरेश कव्हळे, पोलीस निरीक्षक पी.एन. डोंगरदिवे आदींच्या उपस्थितीत पतसंस्था पदाधिकारी आणि खातेदारांमध्ये झालेली चर्चाही निष्फळ ठरली. संस्थेविरोधात खातेदारांनी नारेबाजी केली. कुठल्याही निर्णयाशिवाय खातेदारांना परत जावे लागले. या पतसंस्थेत विविध घटकातील लोकांनी गुंतवणूक केली आहे. मात्र पदाधिकाऱ्यांनी पैसा देण्यास टाळाटाळ चालविल्याने ते अडचणीत आले आहे. (प्रतिनिधी)