शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींची गुंतवणूक मात्र उद्योगाला गती नाही

By admin | Updated: August 26, 2014 23:44 IST

ग्रामीण तरुणांच्या हाताला काम मिळावे, उद्योग व्यवसाय भरभराटीस यावे यासाठी स्थापन केलेल्या उमरखेड येथील एमआयडीसीत उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली.

उमरखेड (कुपटी) : ग्रामीण तरुणांच्या हाताला काम मिळावे, उद्योग व्यवसाय भरभराटीस यावे यासाठी स्थापन केलेल्या उमरखेड येथील एमआयडीसीत उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली. मात्र एमआयडीसीतील दुरावस्थेने उद्योगांना गतीच आली नाही. परिणामी बँकांचे व्याज भरुन उद्योगक मात्र त्रस्त होत आहे.उमरखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर एमआयडीसी आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसीच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र या ठिकाणी १८ उद्योजकांनी आपले उद्योग सुरू केले. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँकांमधूनही कर्ज घेतले. काजू प्रक्रिया उद्योग, तेल मील, दालमील, बॅटरी निर्मिती, मसाला उद्योग, चहापत्ती, भंगार इन्डस्ट्रीज, टायर रिमोल्डींग, अ‍ॅग्रो इन्डस्ट्रीज आदी उद्योग सुरू केले. यासाठी उद्योजकांनी तब्बल ५० कोटींच्यावर गुंतवणूक केली. परंतु आता येथील दुरावस्था पाहता उद्योजक हतबल झाले आहे. एमआयडीसीला २४ तास वीज पुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण फिडरवर एमआयडीसी जोडल्याने वीज पुरवठा खंडित असतो. त्याचा मोठा फटका उत्पादनावर होतो. विजेसोबतच पाण्याचीही गंभीर समस्या आहे. ५० लाख लिटर दररोज पाण्याची आवश्यकता असताना ५० हजार लिटर पाणी उपलब्ध होते. यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहे. यासाठी वारंवार निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नाही. उत्पादन घटत चालले असून बँकांचे दरमहा व्याज मात्र वाढत आहे. (वार्ताहर)