शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

काल्याच्या काळ्या कारनाम्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे काळ्याबाजारात विकले जात आहे, याचा पाठपुरावा करीत आहे. याचीच दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. काल्याची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी रेशनच्या काळ्या बाजारावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेशनचा तांदूळ व गहू याची काळ्या बाजारात विक्री करणारी मोठी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. या टोळीला आजपर्यंत अभय मिळत होते. याचा म्होरक्या कळंब येथील काल्या असून त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्याच्या गोदामातून जवळपास १६ लाखांंचे रेशनचे धान्य जप्त केले. याशिवाय यवतमाळातही दोन धान्य घेवून जाणारे संशयित ट्रक पकडण्यात आले. रेशन माफियाचे नेटवर्क राज्यभर पसरले असून आंतरजिल्हा याची वाहतूक सुरू असते.  रेशन धान्यातून उभ्या केलेल्या काल्याच्या नेटवर्कचा तपास करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली. कळंब ठाणेदारांनी या गुन्ह्यात न्यायालयाकडून काल्याची एक दिवसाची पोलीस कोठडी घेतली होती. कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे काळ्याबाजारात विकले जात आहे, याचा पाठपुरावा करीत आहे. याचीच दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. काल्याची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी रेशनच्या काळ्या बाजारावर लक्ष केंद्रित करण्यात आले. जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून, तेलंगणा सीमेवर रेशनचा तांदूळ, गहू साठवून त्याची विक्री केली जाते. या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यामध्ये अनेक बडे मासे  आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कळंबच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. रेशनचे धान्य परस्पर विकणाऱ्या या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून पुरेपूर तयारी केली जात आहे. इतकेच नव्हे तर काल्याच्या यवतमाळ जिल्ह्यासह वर्धा, तेलंगाणा येथील नेटवर्कचाही शोध घेतला जात आहे. रेशनचा तांदूळ राईस मिलपर्यंत कसा पोहोचतो, घातक रसायने वापरुन या तांदळावर कशी प्रक्रिया करून त्याला सुगंधित तांदळात मिसळून विक्री केली जाते, याचाही शोध पोलीस घेणार आहे. 

पुरवठ्याच्या अहवालाने दोन ट्रक सुटले - जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार रेशनच्या धान्याच्या काळ्या बाजार चालविणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार पोलिसांना नाही, धडधडीत दिसूनही रेशनचे धान्य हे पुरवठा विभागाकडून प्रमाणित करून घ्यावे लागते,  बरेचदा पुरवठ्याची यंत्रणा सोईस्कर भूमिका घेवून ते धान्य रेशनिंगचा नसल्याचा अहवाल देतात, त्यामुळेच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी भांबराजा येथे पकडलेला ५०० पोते संशयित तांदुळाचा ट्रक सोडून द्यावा लागला. तर जिल्हा वाहतूक शाखेने आर्णी बायपासवर पकडलेला ट्रकसुद्धा केवळ पुरवठा विभागाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सोडावा लागला. - पोलीस कारवाई करताच पुढे मात्र रेशनचा अहवाल निर्णायक ठरतो. यामुळेच बरेचदा रेशनच्या काळ्या व्यापाराची माहिती असूनही पोलिसांकडून कारवाईसाठी पुढाकार घेतला जात नाही. पुरवठा विभागाचे सहकार्य मिळत नसल्याचेही सांगितले जाते. गरिबाचे धान्य हडपणाऱ्यांविरोधात पोलीस व पुरवठा विभागाला समन्वय ठेवूनच काम करावे लागणार आहे.  

 

टॅग्स :Policeपोलिसmafiaमाफिया