कारवाईची मागणी : हिंद सेनेसह मुस्लिम बांधवांचेही निवेदनपुसद : पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हल्याचा निषेध करीत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी हिंदसेनेसह मुस्लिम बांधवांकडूनही करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा केल्यामुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी करू न दिल्याने अब्दुल मलिक अहमद रज्जाक या युवकाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. यात तीन पोलीस गंभीर जखमी झाले. या कृतीचा हिंदसेना संघटनेने निषेध केला. सखोल चौकशी करून हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर अॅड़ अर्जुन ठाकुर, शंकर पद्मावार, युवराज कांबळे, अॅड़ रवी वाघमारे, अक्षय महाकाळ, भावेश सदनकर, अंकुश बैस, राजेश बोम्पीलवार, मयुर जयस्वाल, शंभू पटेल, शुभम बारडकर, प्रमोद सरोदे, गोपाल जैस्वाल, राजू कांबळे, गणेश बारडकर, आशुतोष रुणवाल, शुभम जैस्वाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पोलिसांवरील हल्याचा मुस्लिम समाजाच्या नेत्यांनीही निषेध केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. यानिवेदनावर डॉ. वजाहत मिर्झा, डॉ. अकिल मेमन, डॉ. मोहंमद नदीम, रियासत अली, शेख कय्युम, ताहेरखान पठाण, मोहंमद खान, सैय्यद इश्तीयाक सैय्यद इस्माईल, अॅड़ नसरुल्ला खान यांच्या स्वाक्षऱ्या आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध
By admin | Updated: September 27, 2015 02:03 IST