शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
7
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
8
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
9
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
10
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
11
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
12
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
14
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
15
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
16
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
17
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
18
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कालबाह्य वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक

By admin | Updated: June 26, 2014 00:03 IST

महागाव तालुक्यात कालबाह्य वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खिळखिळे झालेले वाहन आणि नवशिके चालक यामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

धनोडा : महागाव तालुक्यात कालबाह्य वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खिळखिळे झालेले वाहन आणि नवशिके चालक यामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. महागाव तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. पुसद ते माहूर, महागाव ते उमरखेड आणि इतर मार्गावर ही वाहतूक सुरू आहे. दररोज शेकडो वाहने धावत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसपुढे ही वाहने धावत असल्याने एसटीला प्रवासीच मिळत नाही. या प्रकाराने अनेक बसफेऱ्याही बंद झाल्या. वर्षानुवर्षे तेच वाहने रस्त्यावर धावत आहे. जुजबी डागडुजी करून वाहन चालविले जाते. त्यातच पुसद ते माहूर मार्गावरील कान्हाजवळ रस्ता उखडलेला आहे. तसेच धनोडा ते माहूर मार्गही उखडलेला आहे. उखडलेल्या रस्त्यावरून कालबाह्य वाहने खचाखच प्रवासी भरून धावताना दिसत आहे. प्रवाश्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. या प्रकारामुळे अपघातात वाढ झाली आहे.महागाव पोलीस अर्थपूर्ण संबंधामुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. यवतमाळ, उमरखेड, पुसद, माहूर या मार्गावर शेकडो वाहने धावत असताना पोलिसांना मात्र ते दिसत नाही. आरटीओ अधिकारी या रस्त्यावरून येत असल्यास आगाऊ सूचना मिळते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट असतो. अधिकाऱ्यांनाही सर्व आलबेल असल्याचे दिसते. मात्र कालबाह्य वाहने प्रवाश्यांसाठी जीव घेणे ठरत आहे. (वार्ताहर)