यवतमाळ : भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्यावतीने उपवर बंजारा युवक-युवती परिचय मेळावा येथे घेण्यात आला. यात १३७ युवती व ७८ युवकांनी सहभाग नोंदविला. यावेळी माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक, के.डी. जाधव, डॉ. टी.सी. राठोड, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, डॉ. सुरेश मुडे, यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव, माजी उपायुक्त पी.बी. आडे, प्राचार्य टी.व्ही. राठोड, विलासराव राठोड, भाऊराव राठोड, नाईक, वसराम राठोड, नवलकिशोर राठोड, जी.एल. राठोड आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार प्रदीप नाईक (किनवट), आमदार डॉ. तुषार राठोड (मुखेड), एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शेषराव चव्हाण यांचे शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आले. प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष नवलकिशोर राठोड, तर आभार प्रा.डॉ. बळी राठोड यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी टी.टी. जाधव, बी.सी. राठोड, जवाहर राठोड, यशवंत राठोड, नारायण आडे, शेषराव आडे, राजा पी. चव्हाण, हरिचंद राठोड, बी.पी. जाधव, वसंत राठोड, अनिल राठोड, संतोष चव्हाण, शेखर राठोड, गणेश चव्हाण, अभिमान राठोड, राजू चव्हाण, व्ही.डी. राठोड, संजय जाधव, कैलास चव्हाण, देवराव चव्हाण, पंडित आडे, बाळू चव्हाण, डी.पी. चव्हाण, सुधाकर जाधव आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
बंजारा समाजाचा परिचय मेळावा
By admin | Updated: January 2, 2017 00:26 IST