शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या बोधिसत्त्वने तयार केली सुगम चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:04 IST

अगदी लहान वयात बोधिसत्वने कौशल्याची कास धरली. भल्यालभल्यांना जे जमत नाही ते त्याने सहावीत असतानाच करून दाखविले. विशेषत: शेतकऱ्यांचे दु:ख प्रत्यक्ष जाणणाºया या चिमुकल्याने तयारी केलेली सुगम चाळणी शेतकरी महिलांच्या वेदनेवर गुणकारी ठरणारी आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर : साहित्य संमेलनात अध्यक्षांनी केला गौरव

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अगदी लहान वयात बोधिसत्वने कौशल्याची कास धरली. भल्यालभल्यांना जे जमत नाही ते त्याने सहावीत असतानाच करून दाखविले. विशेषत: शेतकऱ्यांचे दु:ख प्रत्यक्ष जाणणाऱ्या या चिमुकल्याने तयारी केलेली सुगम चाळणी शेतकरी महिलांच्या वेदनेवर गुणकारी ठरणारी आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या हस्ते या चाळणीचे वाटप करण्यात आले. यावेळी बोधिसत्वच्या पाठीवर पडलेली अनेकांची कौतुकाची थाप प्रेरणेला गती देऊन गेली.यवतमाळच्या भोसा परिसरातील ईश्वरनगरात राहणारा बोधिसत्त्व गणेश खंडेराव हा पर्यावरण रक्षणाचा सच्चा साथी आहे. पावसाळ्यात सीडबॉलच्या माध्यमातून त्याने अनेक रोपटी निर्माण केली. त्याला यवतमाळकर जनतेचीही मोठी साथ मिळाली. उपक्रम आणि प्रबोधनाची तळमळ असलेल्या बोधिसत्वने आपल्या कौशल्याला वाव देत ‘सुगम चाळणी’ तयार केली. सुगीच्या दिवसात धान्य साफ करण्यासाठी होणारा त्रास कमी करण्याचे हे यंत्र आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपद्ग्रस्त कुटुंबातील ३५ महिलांना या चाळणीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोधिसत्वच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.सुगीच्या दिवसात त्रास कमीसुगीच्या दिवसात ग्रामीण भागातील महिला धान्य साफ करण्यासाठी चाळणी वापरतात. ही कामे करताना त्यांचे हात गळून जातात, वेदना होतात. बोधिसत्वने तयार केलेले चाळणीयंत्र वेदना आणि थकवा दूर करणारे आहे. या यंत्राद्वारे एका तासात एक ते दोन पोते धान्य सहज साफ करता येतात. सहज आज सोप्या पध्दतीने हाताळता येते. घरातील कुठलाही व्यक्ती हे यंत्र हाताळू शकतो. उपक्रमांमध्ये झोकून देणाºया बोधिसत्वला वडील गणेश आणि आई अमृता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन