शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

ट्रक चोरांचे आंतरजिल्हा रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:24 IST

ट्रक चोरांची आंतरजिल्हा टोळी स्थानिक पोलिसांच्या निशाण्यावर आहे. पोलिसांचे हात या टोळीच्या अगदी जवळ पोहोचले असून या माध्यमातून १८ ते २० ट्रक जप्त करण्याची तयारी पोलिसांच्या स्तरावर सुरू आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा वॉच : १८ ते २० ट्रक निशाण्यावर, चेचीस क्रमांकांचा गैरवापर

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ट्रक चोरांची आंतरजिल्हा टोळी स्थानिक पोलिसांच्या निशाण्यावर आहे. पोलिसांचे हात या टोळीच्या अगदी जवळ पोहोचले असून या माध्यमातून १८ ते २० ट्रक जप्त करण्याची तयारी पोलिसांच्या स्तरावर सुरू आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात गेल्या सहा महिन्यांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे डिटेक्शन वाढले आहे. नवनवीन गुन्हे उघडकीस आणण्यावर एलसीबीचा भर आहे. या माध्यमातून एलसीबीची गतिमानता वाढली आहे. डिटेक्शनच्या याच साखळीतून पोलिसांनी चोरीतील ट्रकवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. सूत्रानुसार, यवतमाळ शहरात ट्रक चोरांचे एक रॅकेट सक्रिय आहे. त्याची व्याप्ती अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. या टोळीचे सदस्य यवतमाळातच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यांमध्येही विखुरले गेले आहेत. ही टोळीच पोलिसांच्या निशाण्यावर आहे. या टोळीने चोरीतील व्यवहार केलेल्या ट्रकचे क्रमांक पोलिसांनी ट्रेस केले आहे. या क्रमांकाच्या माध्यमातूनच पोलिसांचे हात ट्रक चोरांच्या या टोळीतील सदस्यांच्या कॉलरपर्यंत पोहोचणार आहेत. बाहेरुन आलेले, भंगारात खरेदी केलेले ट्रक विकले गेले आहेत. त्यासाठी चेसीस नंबरचा गैरवापर केला गेला आहे. नंबर एका वाहनाचा आणि त्यावर पासिंग दुसऱ्याच वाहनाचे असे प्रकार घडले आहे. यापूर्वी पोलिसांनी २००८-०९ मध्ये अशा पॅटर्नवर चालणाºया टोळीचा पर्दाफाश करून १५ ते १६ चारचाकी वाहने जप्त केली होती. हे ट्रक आजूबाजूच्या जिल्ह्यात बोगस कागदपत्रांवर पासिंग झाल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. ट्रक चोरांची ही टोळी या व्यवसायातील दिग्गजांकडून आॅपरेट केली जात असल्याचे सांगितले जाते. ही टोळी हाती लागल्यास १८ ते २० ट्रक जप्त होऊ शकतात, असा दावा पोलीस दलातून केला जात आहे.असे झाले होते बोगस पासिंगजुन्या ट्रकवर एक ते दीड लाखांचा टॅक्स प्रलंबित होता. म्हणून पुसद विभागातील एका ड्रायव्हींग स्कूलच्या संचालकाने अवघ्या ३० हजारात हा ट्रक बोगस पद्धतीने पासिंग करून देण्याचा नवा फंडा शोधला. नवा क्रमांक मिळाल्याने ट्रकची किंमतही वाढली आणि जुना प्रलंबित कर भरण्याची गरजही पडली नाही. त्यासाठी बोगस रहिवासी दाखले, सही-शिक्के, स्टॅम्प वापरले गेले. या प्रकरणात सीआयडीने जिल्ह्यातून ड्रायव्हींग स्कूल संचालक, फायनान्स एजंट, प्रिंटींग प्रेस संचालक तसेच बारामती, अंबेजोगाई, नांदेड आदी भागातील आठ ट्रक चालक अशा डझनावर आरोपींना अटक केली. याच पद्धतीने सध्याही ट्रक चोरी व बोगस पासिंगचा धंदा अन्य जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयांमध्ये सुरू असण्याचा संशय पोलिसांना आहे.१२ वर्षांपासून सीआयडी तपास सुरूच!यवतमाळच्या डेप्युटी आरटीओ कार्यालयात २००६-०७ मध्ये ३८ ट्रकच्या बोगस पासिंगचा घोटाळा उघडकीस आला होता. हा घोटाळा सखोल तपासासाठी त्याचवेळी यवतमाळ सीआयडीला (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) सोपविण्यात आला होता. परंतु गेल्या १२ वर्षांपासून हा तपास सुरूच आहे. अर्धा डझनापेक्षा अधिक तपास अधिकारी बदलूनही या प्रकरणात सीआयडीला अद्याप दोषारोपपत्र सादर करता आलेले नाही. मध्यंतरी हा तपास सीआयडीच्या अमरावती पथकाकडे देण्यात आला होता. मात्र काही महिने तेथे प्रलंबित राहून पुन्हा तो यवतमाळला परत पाठविला गेला.