शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना केवळ सहा हजारात बसवावा लागतो महिन्याचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:38 IST

डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करून सक्तीची असलेली आंतरवासीता (इंटर्नशीप) करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ २०० रुपये रोज विद्यावेतन दिले जाते.

ठळक मुद्देरोज केवळ २०० रुपये विद्यावेतन महाराष्ट्रात सर्वात कमी आरोग्य सेवेची चेष्टा, भोजन व निवासाचे वांधे

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करून सक्तीची असलेली आंतरवासीता (इंटर्नशीप) करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ २०० रुपये रोज विद्यावेतन दिले जाते. महिन्याकाठी मिळणाऱ्या सहा हजार रुपयात भोजन, घरभाडे आणि इतर खर्च भागविताना या डॉक्टरांना अवघड शस्त्रक्रिया करतानाचा अनुभव येतो. राज्यभरातील सुमारे पाच हजार डॉक्टरांचा हा प्रश्न अतिशय जटील झाला आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी विद्यावेतन महाराष्ट्रात आहे. सरकारकडून या डॉक्टरांची चेष्टा केली जात आहे.एमबीबीएस, बीएएमएस, बी.डीएस., आदी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षे इंटर्नशीप करावी लागते. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी तीन महिने आणि आयुर्वेद किंवा वैद्यकीय महाविद्यालयात सहा महिने सेवा द्यावी लागते. दिवसभरात किमान सहा ते आठ तास ड्यूटी सक्तीची आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये विद्यावेतन शासनाकडून दिले जाते. आंतरवासीता करत असलेले बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहे. सहा हजार रुपयात भागत नाही. कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असल्याने पालकही पैसा पुरवू शकत नाही.विशेष म्हणजे सर्वात कमी विद्यावेतन महाराष्ट्रात सहा हजार रुपये आहे. केरळ राज्यात सर्वाधिक २३ हजार रुपये विद्यावेतन या डॉक्टरांना मिळते. कोलकाता १९ हजार, ओडिशा व झारखंड १५ हजार, हरियाणा १२ हजार एवढे विद्यावेतन दिले जाते. महाराष्ट्र शासनाने ११ हजार रुपये विद्यावेतन द्यावे, अशी मागणी या विद्यार्थी डॉक्टरांनी लाऊन धरली. २०१५ मध्ये विद्यावेतनात सहा हजार रुपये झाले होते. यात वाढ करून ११ हजार रुपये विद्यावेतनाची मागणी विद्यार्थ्यांनी केली. सरकारने याची अंमलबजावणी केली नाही. आजच्या महागाईच्या काळात सहा हजार रुपयात भागवायचे कसे, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.वसतिगृह प्रवेश बंदआंतरवासीता डॉक्टरांचे शासकीय महाविद्यालयातील वसतिगृह प्रवेशही काही वर्षांपासून बंद झाले आहे. प्रामुख्याने आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. शासनाचे आयुर्वेदाला प्राधान्य असले तरी, या विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी मोठी अनास्था असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, विद्यावेतनाचा प्रश्न शासनाकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आला असल्याचे ‘निमा’ स्टुडन्ट नागपूर शाखेचे अध्यक्ष शुभम बोबडे यांनी सांगितले. शासन गंभीर नसल्याने वारंवार संपावर जाण्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र