शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

कॅन्सरग्रस्तांचा यवतमाळकरांशी जाहीर सुसंवाद

By admin | Updated: June 14, 2014 23:53 IST

कॅन्सरसारख्या असाध्य रोगासोबत लढत असतानाच इतरांनाही जगण्याचे बळ द्यावे म्हणून प्रयास-सेवांकूरच्यावतीने यवतमाळात कॅन्सरग्रस्तांच्या संघर्ष गाथा उलगडून लावणाऱ्या एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन

जगण्याची लढाई : प्रयास-सेवांकूरचे आयोजनयवतमाळ : कॅन्सरसारख्या असाध्य रोगासोबत लढत असतानाच इतरांनाही जगण्याचे बळ द्यावे म्हणून प्रयास-सेवांकूरच्यावतीने यवतमाळात कॅन्सरग्रस्तांच्या संघर्ष गाथा उलगडून लावणाऱ्या एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील महेश भवनामध्ये रविवारी १५ जूनला सायंकाळी ६.३० वाजता या प्रेरणादायी कार्यक्रमाचे नि:शुल्क आयोजन करम्यात आले आहे.कॅन्सर हा शब्द ऐकला की, माणसाचा धीर सुटून जातो. जगण्याची उमेद नुसत्या कल्पनेनेच हरवून बसते. मात्र कॅन्सरचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होऊ न देता अत्यंत सकारात्मक पद्धतीने जीवन जगणाऱ्या नागपूर येथील डॉ.निर्मला वझे, अमरावती येथील छाया भट्ट, यवतमाळ येथील जीवतराम कटियार, यवतमाळातीलच शीला कांबळे व डॉ.सुरेश मुडे यांची कहाणी जनतेसमोर उलगडल्या जाणार आहे. मागील तीन महिन्यांपासून प्रयास-सेवांकूरच्यावतीने सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचे ठसे उमटविणाऱ्या कार्यकर्त्यांची ओळख शहरवासीयांना कार्यक्रमाच्या माध्यमातून करून देण्यात येत आहे. कॅन्सरग्रस्तांच्या संघर्ष गाथेचा हा अनोखा कार्यक्रम अनेकांना जगण्याची नवी उभारी देणारा आहे. निर्मला वझे यांना वयाच्या ४० व्या वर्षी स्तनाचा कॅन्सर झाला. त्यानंतर पुन्हा एकदा रिकरन्स झाला. आर्कीटेक्ट असलेल्या स्वत:च्या मुलीलाही लग्नानंतर महिनाभरातच कॅन्सरचे निदान झाले. उपचारानंतर मुलीचा कॅन्सरही बरा झाला. या सर्व दिव्यातून गेल्यावरही ६८ व्या वर्षीसुद्धा स्त्रीरोग तज्ञ असलेल्या डॉ.निर्मला वझे स्वस्थ आयुष्य जगत आहेत. संंपूर्ण देशभरात त्या कॅन्सरवर जनजागृती करीत असून अनेकांना आधार दिला आहे. १९९२ मध्ये मध्यप्रदेश सरकारचा सर्वोच्च खेळ सन्मान प्राप्त केलेल्या अमरावती येथील छाया भट्ट यांना आतड्याचा कॅन्सर झाला. तीन आॅपरेशन्स व आठ केमोथेरपी झाल्यानंतर पुन्हा खेळण्याचा सराव सुरू केला. फेब्रुवारी २०१४ मध्ये जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेमध्ये त्यांनी दोन सुवर्ण व दोन रजत पदके प्राप्त केली. १९८४ ते २०१० दरम्यान राष्ट्रीय स्पर्धांमध्ये २६ वेळा पहिल्या तीनमध्ये स्थान पटकाविले. अ‍ॅथलेटिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके प्राप्त केली. चिन, तैवान, फिलीपाईन्स, स्विडन, कझाकिस्तान येथे पार पडलेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. यवतमाळातील जीवतराम कटियारा चाळीशीत कॅन्सर झाल्यानंतर आज वयाच्या ७० व्या वर्षी कॅन्सरमुक्त जीवन जगत आहे. डॉ.सुरेश मुडे यांना वयाच्या ४५ व्या वर्षी पोटाच्या लिंकोमा कॅन्सरने ग्रासले. आज वयाच्या ६१ व्या वर्षी ते कॅन्सरमुक्त जीवन जगत असून वैद्यकीय व्यवसायासह विविध सामाजिक प्रश्नांवर लेखन करीत आहे. शिलाताई कांबळे यांनीसुुद्धा स्तनाच्या कर्करोगाशी संंघर्ष करीत आपले सामाजिक योगदान कायम ठेवले आहे. अशा या कॅन्सरग्रस्तांची संघर्षगाथा यवतमाळकरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)