शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीवर संशय

By admin | Updated: June 25, 2016 02:23 IST

शिवाजीनगर येथील पंकज नानवाणी यांच्याकडील घटनेत गुन्हेगारांच्या आंतरजिल्हा टोळीचा सहभाग असावा,

नानवाणीकडील दरोडा : एसपींची माहिती, सीसीटीव्ही फुटेजमध्येही ‘क्ल्यू’, तरुणाईवर ‘वॉच’ यवतमाळ : शिवाजीनगर येथील पंकज नानवाणी यांच्याकडील घटनेत गुन्हेगारांच्या आंतरजिल्हा टोळीचा सहभाग असावा, असा संशय असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’ला दिली. एसपी सिंह म्हणाले, नानवाणी यांच्याकडील घटनेत सहभागी व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात काही ‘क्ल्यू’ मिळत आहेत. त्यातून या तपासात निश्चित प्रगती होईल. दारव्हा रोडवरील सतीश फाटक यांच्याकडील गुन्ह्यात आंतरजिल्हा टोळीचा सहभाग उघड झाला. नानवाणी यांच्याकडेही गुन्ह्याची हीच पद्धत होती. त्यामुळे या गुन्ह्यातही आंतरजिल्हा टोळीच असावी, असा संशय आहे. तरीही तपासाच्या दृष्टीने सर्व पैलूंवर भर दिला जात असल्याचे सिंह यांनी सांगितले. अखिलेशकुमार सिंह म्हणाले, तरुणाईच्या गरजा वाढल्या आहेत, परंतु त्या तुलनेत पैसा उपलब्ध होत नाही. सुशिक्षित तरुण आहेत, परंतु त्यांच्या हाताला काम नाही. रोजगार नसला तरी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसा हा लागतोच. या तरुणांची परिश्रम करून प्रामाणिकपणे पैसा मिळविण्याची तयारी नाही. मग ही तरुणाई गरजा पूर्ण करण्यासाठी सहज मिळणाऱ्या पैशांकडे वळते आहे. त्यातूनच गुन्हेगारी जगतात नव्या चेहऱ्यांनी पाय रोवले आहेत. हे नवे चेहरे अद्याप पोलिसांच्या रेकॉर्डवर आले नसले तरी त्यांना रेकॉर्डवर घेण्याचे काम सुरू झाले आहे. कुणाला वाटणार नाही अशी मुले गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय आहे. त्यांचा लवकरच पर्दाफाश होणार आहे. पालकांनीही आपल्या मुलांबाबत व त्याच्या मित्र मंडळींबाबत सतर्क राहणे तेवढेच गरजेचे आहे. त्यांची ही सतर्कता मुलाला गुन्हेगारी विश्वात एन्ट्री करण्यापासून निश्चितच रोखू शकते. यवतमाळ पोलिसांचे डिटेक्शन वाढले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिटेक्शन केले जात आहे. फाटक यांच्याकडील दरोडा, कळंबमधील चेनस्नॅचिंग, पुसदमध्ये जबरी चोरी, अनेक घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. आणखी डिटेक्शनचे प्रमाण वाढविले जाईल. चार्ली पेट्रोलिंग, प्रतिबंधात्मक कारवाई व अन्य उपाययोजना केल्या जात आहे. पोलिसांचा अनेकांवर गुप्त वॉच आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागरिकांनो सावधान, क्राईम पॅटर्न बदलला, जागरुकता हाच उपाय जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले की, वाढत्या वसाहती, वाढती लोकसंख्या, अत्याधुनिक साधन सामुग्री यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या संख्येचा मेळ बसविणे कठीण आहे. त्यामुळे आता नागरिकांनी केवळ पोलिसांवर विसंबून न राहता स्वत: पूर्णवेळ सतर्क राहून स्वत:च्या जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षा सांभाळणे गरजेचे आहे. पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहेतच. पण त्यांना बळ देण्यासाठी नागरिकांनीही संकटात पोलिसांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना सतर्क करणे, सहकार्य करणे तेवढेच गरजेचे आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय पोलीस यशस्वी होऊ शकणार नाही. लोकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा, पोलीस तुमच्या सुरक्षेसाठीच आहेत, त्यांची भीती बाळगण्याची गरज नाही. अलिकडे अत्याधुनिक साधनांमुळे क्राईम पॅटर्न बदलला आहे. पूर्वी रात्रीला आणि बंद घरातच चोऱ्या व्हायच्या. परंतु आता दिवसाही चोरटे घरांना निशाणा बनवू लागले आहेत. कारण त्यांच्याकडे दळणवळणाची आधुनिक साधने उपलब्ध आहे. त्याद्वारे ते गुन्हा करून पोलिसांना खबर लागण्यापूर्वी दुसऱ्या जिल्ह्यात सहज पळून जाऊ शकतात. म्हणूनच दुपारच्या वेळी घरी राहणाऱ्या गृहिणींनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. कुणी आपल्या घरावर वॉच ठेवतो का, याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. घरात दुपारी कुणी नसेल अशा वेळी एकट्या असलेल्या महिला-मुलांनी मुख्य दार बंद ठेवणे, शक्य असल्यास फाटकाला कुलूप लावणे, अशी खबरदारी घ्यावी, असे अखिलेशकुमार सिंह यांनी सूचविले. नागरिकांनी दहशतीत राहण्याची, घाबरण्याची काही एक गरज नाही. पण दक्षता बाळगणे हे जागरुक नागरिकाचे कर्तव्य आहे. कुठेही काहीही धोकादायक वाटत असेल, चुकीचे होत असेल तर निर्भिडपणे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन अखिलेशकुमार सिंह यांनी जिल्हाभरातील नागरिकांना ‘लोकमत’च्या माध्यमातून केले आहे.