शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’मधील विमा दुकानदारीचा भंडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 20:49 IST

राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेच्या नावाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुकानदारी थाटून

ठळक मुद्दे१८ दिवसांपासून आरोग्य प्रशासन अनभिज्ञराष्ट्रीय योजना कार्डच्या नावाने गोरगरिबांची फसवणूक

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेच्या नावाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुकानदारी थाटून रुग्णांची लुबाडून करण्याचा प्रकार ‘लोकमत’मुळे उघडकीस आला. गत १८ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत अधिष्ठातांसह रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ असल्याचे पुढे आले.यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर कक्ष थाटून काही तरुणांनी राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेची नोंदणी सुरू केली होती. गत १८ दिवसांपासून या रुग्णालयात येणाºया गोरगरीब जनतेकडून शंभर रुपये वसूल केले जात होते. ही योजना एपीएल आणि बीपीएल कुटुंबासाठी असून वार्षिक विमा योजना असल्याचे तेथील तरुण सांगत होते. यासाठी एक अर्ज भरुनघेऊन शंभर रुपये घेण्यात येत होते. विशेष म्हणजे अर्जावर कोणताही क्रमांक नव्हता. तसेच कुटुंबाची केवळ जुजबी माहिती घेतली जात होती. कुटुंब प्रमुखाचे आधार, रेशन कार्ड, वीज बिल आणि दोन फोटो मागविले जात होते. हा अर्ज भरल्याची रितसर पावतीही दिली जात नव्हती. गत १८ दिवसांपासून शेकडो रुग्णांकडून शंभर रुपयाप्रमाणे वसुली करण्यात आली.हा प्रकार प्रस्तूत प्रतिनिधीच्या लक्षात आला. त्याबाबत चौकशी केली तेव्हा नोंदणी करणाºया युवकांची बोबडीच वळली. अधिष्ठातांच्या आदेशाने हा प्रकार सुरू असल्याचे सांगत लोहारा येथील आशिष गोल्हर नामक तरुण तालुका समन्वयक असल्याचे सांगितले. आशिष गोल्हरशी मोबाईलवरून संपर्क केला असता त्याने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या निर्देशावरून ही योजना राबवित असल्याचे ठामपणे सांगितले. मात्र त्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने अधिष्ठाता आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे याप्रकाराबाबत माहिती विचारली. त्यावरून शासनाकडून असा कोणताच कार्यक्रम राबविला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी तर थेट या युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता कोणतेच अधिकृत दस्तावेज आढळून आले नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड यांनी तालुका समन्वयकाला मोबाईलवर संपर्क केला. त्याला डीएचओ कार्यालयात येण्यास सांगितले. मात्र त्याने आपला फोन स्वीच आॅफ करून प्रतिसाद देणे टाळल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासारख्या ठिकाणी कुणीही येतात, दुकानदारी थाटतात, गोरगरिबांची लूट करतात मात्र याची खबरबात १८ दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाला नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारामागे ‘मेडिकल’मधील कोणता अदृश हात आहे, याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आता पोलिसात तक्रार झाल्यानंतर वास्तव बाहेर येणार आहे.शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सुरू असलेला विमा कार्ड योजनेचा प्रकार पूर्णत: नियमबाह्य आहे. त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. शिवाय अशी कुठलीही योजना नसल्याने या प्रकरणाची तक्रार पोलिसात देत आहो.- डॉ. अशोक राठोडअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.