शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

३६ लाख हेक्टरवरील पिकांचे विमा कवच रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 15:22 IST

पीक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी पंतप्रधान विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ३६ लाख हेक्टरवरील पेरण्या थांबलेल्या आहेत.

ठळक मुद्देपेरणीपूर्वीच योजनेची मुदत संपणार पाऊस न बरसलेल्या २४ जिल्ह्यातील नापेर क्षेत्राने नाव पेच

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पीक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी पंतप्रधान विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ३६ लाख हेक्टरवरील पेरण्या थांबलेल्या आहेत. तर दुसरीकडे पीक विमा काढण्याची वाढीव अंतिम मुदत केवळ चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांनाच हा विमा काढता येतो. त्यामुळे यंदा ३६ लाख हेक्टरवरील पीक विम्याच्या संरक्षणाबाहेर राहणार आहे.आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. हा दावा किती पोकळ आहे, याचा प्रत्यय पीक विमा उतरविताना येत आहे. नैसर्गिक संकटामुळे संपूर्ण राज्य होरपळत आहे. पाऊस नसल्याने राज्यातील २४ टक्के पेरण्या अजूनही शेतकऱ्यांना करता आल्या नाही. यामुळे हे शेतकरी मोठ्या आशेने पंतप्रधान पीक विमा योजनेकडे पाहत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी पिकांची पेरणी होणे बंधनकारक आहे.आता निसर्गच रूसला, तर पेरणी करायची कशी असा प्रश्न पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची गरज असताना मुदत संपत असल्याने त्यांना मदतीला मुकावे लागणार आहे.राज्यातील २४ जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत पेरणीपूर्वीच संपत आहे. यामुळे ३६ लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागच नोंदविता येणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होणे आणि मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. राज्यातील एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी एक कोटी १५ लाख हेक्टरवरच्या पेरण्या आटोपल्या आहेत. तर ३६ लाख हेक्टरवरच्या पेरण्या अजूनही थांबलेल्या आहेत.विमा कंपन्यांची चलाखीनिसर्ग कोपल्याने ज्या भागात पेरण्या झाल्या नाही, अशा ठिकाणी उंबरठा उत्पन्न शून्य येणार आहे. कारण पीक करपल्याने या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही. यामुळे उत्पन्न निरंक राहण्याचा धोका आहे. हे उत्पन्न सरासरी उत्पन्नाच्या कमी असणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे कंपन्यानी तत्पूर्वीच विम्याची मुदत गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :agricultureशेती