शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तहसीलदारासह इन्शुरन्स कंपनीला चपराक

By admin | Updated: December 22, 2015 03:55 IST

शेतकरी कुटुंबाला अपघात विम्याचा लाभ देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल दि ओरिएन्टल इंशुरन्स कंपनीला, तर प्रकरण

यवतमाळ : शेतकरी कुटुंबाला अपघात विम्याचा लाभ देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल दि ओरिएन्टल इंशुरन्स कंपनीला, तर प्रकरण सादर करण्यास दिरंगाईचा आरोप सिद्ध झाल्याबद्दल पांढरकवडा तहसीलदारांना जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. झुली (ता. पांढरकवडा) येथील ठाकरे या शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर हा आदेश देण्यात आला आहे. गजानन बापूराव ठाकरे यांचा ९ फेब्रुवारी २००८ रोजी अपघाती मृत्यू झाला. शासनाने काढलेल्या शेतकरी व्यक्तिगत विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी संबंधितांकडे पाठपुरावा केला. यात विमा कंपनीसह कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाचा समावेश होता. मात्र त्यांच्या अर्जाची कुठेही दखल घेण्यात आली नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना टोलविले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही समाधानकारक सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे हक्काच्या रकमेपासून सदर कुटुंब वंचित राहिले. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार नोंदविली. शारदाबाई गजाननराव ठाकरे, प्रज्वल गजाननराव ठाकरे, वैभव गजाननराव ठाकरे, रोशन गजाननराव ठाकरे यांची संयुक्त तक्रार न्यायमंचने दाखल करून घेतली. याप्रकरणात दोन्ही बाजुकडून युक्तिवाद करण्यात आला. यात न्यायमंचने ठाकरे यांची तक्रार अंशत: मंजूर केली. गजानराव ठाकरे यांचा मृत्यू विमा कालावधीत झाला मात्र पांढरकवडा तहसीलदारांनी आवश्यक ती कारवाई केली नाही. या प्रकरणात पांढरकवडा तहसील कार्यालयाकडून दिरंगाई करण्यात आली. याप्रकरणात दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनी आणि पांढरकवडा तहसील कार्यालय ठाकरे कुटुंबीयांना विमा लाभापासून वंचित राहण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. विमा कंपनीने ठाकरे यांना योजनेची रक्कम रुपये एक लाख आणि मानसीक व शारीरिक त्रासापोटी पांढरकवडा तहसील कार्यालयाने दोन हजार रुपये व तक्रार खर्चापोटी एक हजार रुपये द्यावे असा आदेश दिला आहे. मंचचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सदस्य अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे, डॉ. अशोक सोमवंशी यांनी हा आदेश दिला. सदर प्रकरणात ठाकरे यांची बाजू अ‍ॅड़ हजारे, अ‍ॅड़ राठी यांनी मांडली. (वार्ताहर)