शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महानिरीक्षक पुसदमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:12 IST

येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाला होता. त्यानंतर जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी सायंकाळी पुसदला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

ठळक मुद्देआढावा घेतला : सण-उत्सवांच्या तयारीबाबत केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाला होता. त्यानंतर जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी सायंकाळी पुसदला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.गेल्या रविवारी रात्री संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रवीण दादाराव कदम यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला झाला होता. त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहण करण्यात आली होती. यात प्रवीण कदम गंभीर जखमी झाले. यानंतर त्याच दिवशी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ५०० ते ६०० जणांच्या जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लबोल केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी पुसदला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. नंतर वसंतनगर पोलीस ठाण्याला भेट दिली.रानडे यांनी वसंतनगर, पुसद शहर, पुसद ग्रामीण व खंडाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी घटनेचा परिपूर्ण आढावा घेतला. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना त्वरीत अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. रानडे यांनी गेल्या चार वर्षांच्या गुन्ह्याचा पोलीस ठाणे निहाय आढावा घेतला. तसेच येत्या काळातील सण, उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी कोणती भूमिका घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वसंतनगरचे ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी, शहरचे ठाणेदार रमेश आत्राम, ग्रामीणचे ठाणेदार संजय चौबे, खंडाळाचे ठाणेदार बी.एस. ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, एलसीबीचे नीलेश शेळके यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.