शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

‘मेडिकल’च्या स्वीय प्रपंच खात्याची चौकशी

By admin | Updated: May 1, 2015 01:56 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वीय प्रपंच खात्यात झालेल्या ..

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वीय प्रपंच खात्यात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने या गैरप्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून विविध स्वरूपाच्या तपासण्यांसाठी सेवा शुल्क आकारले जाते. ही रक्कम रुग्णालयाच्या स्वीय प्रपंच खात्यात जमा करण्यात येते. ही रक्कम जमा करताना योग्य रकमेच्या पावत्या न फाडता परस्पर खिशात वळती करण्यात आली. या गंभीर प्रकाराला ‘लोकमत’ने वाचा फोडली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने आता दाखल रुग्ण आणि स्वीय प्रपंच खात्यात जमा झालेली रक्कम याची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी बधीरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दामोधर पटवर्धन, अधीक्षक डॉ. किशोर इंगोले, डॉ. शरद कुचेवार, कार्यालयीन अधीक्षक वागदरे यांची समिती तयार करण्यात आली आहे.या समितीकडून स्वीय प्रपंच खात्यात जमा झालेली रक्कम आणि प्रत्यक्ष उपचारासाठी दाखल रुग्ण याची पडताळणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. या समितीने रुग्णालयातून पळून गेलेल्या काही रुग्णांशीही संपर्क करणे आवश्यक आहे. त्यातून आणखी गंभीर बाब पुढे येण्याची शक्यता आहे. आता ही समिती किती पारदर्शकपणे चौकशी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रमाणेच रुग्णालय प्रशासनातील सर्जिकल, किरकोळ भांडार आणि किचनची चौकशी करणे आवश्यक आहे. याच विभागांमध्ये अनेक वर्षांपासून कर्मचारी ठिय्या मारून आहे. त्यांना तीन वर्षात बदलीचा कायदा लागू आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. अंतर्गत बदलीतही सोईच्या ठिकाणीच नियुक्ती मिळविण्यात येथील कर्मचाऱ्यांचा हातखंड आहे. (कार्यालय प्रतिनिधी)