शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
2
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
3
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
4
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
5
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
6
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
7
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
8
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
9
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
10
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
11
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
12
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
13
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
15
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
16
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
17
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
18
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
19
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
20
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...

शेतमालाच्या आधारभूत किमतीत अन्याय

By admin | Updated: June 19, 2016 02:16 IST

शेतमालाची आधारभूत किंमत घोषित करताना केंद्र ्रसरकारने याहीवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.

शेतकरी संघटना : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलीयवतमाळ : शेतमालाची आधारभूत किंमत घोषित करताना केंद्र ्रसरकारने याहीवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. सलग तिसऱ्या वर्षी शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना आधार देण्या ऐवजी नगण्य भाववाढ करून त्यांचा विश्वासघात केला, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. शेतमाल उत्पादन खर्चात दरवर्षी सतत वाढ होत आहे. मात्र उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दाभडी (ता. आर्णी) येथे नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा भरून शेतमालाचे दर ठरविले जाईल असे जाहीर केले होते. शिवाय इतर ठिकाणी झालेल्या सभांमध्येही त्यांनी हे आश्वासन दिले होते. मात्र २०१६-१७ या वर्षाकरिता जाहीर झालेल्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती पाहता नगण्य वाढ दिली आहे. कापूस व धानाला केवळ ६० रुपये प्रती क्विंटल वाढ दिली. देशात तेलबिया व खाद्यतेलाचा तुटवडा असताना सोयाबीनवर केवळ ६.७ टक्के म्हणजे १७५ रुपये वाढ केली आहे. धानाची आता आधारभूत किंमत एक हजार ४७० रुपये आखुड धाग्याच्या कापसाला तीन ८६० रुपये व लांब धाग्याच्या कापसाला चार हजार १६० रुपये घोषित करून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे. शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अ‍ॅड़ वामनराव चटप, सरोजताई काशीकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, शैला देशपांडे, संजय कोले, मधु भरणे, अनिल घनवट, जगदीश नाना बोंडे, माया पुसदेकर, नाना खांदवे, दवेंद्र राऊत, विजय निवल, देवराव पाटील धांडे, प्रज्ञा चौधरी, जयंतराव बापट, मारोतराव काळे, बापू पाटील चौधरी, दशरथ बोबडे, रमेश मांगुळकर, दीपकअण्णा आनंदवार, बाळासाहेब देशमुख, नारायणराव बोरकर, इंदरचंद बैद, राजू कुंचटवार, वैकुंठराव मुंडे, शरद पडगीलवार, हसनराव देशमुख, बबनराव चौधरी, चंद्रशेखर देशमुख यांनी केली आहे. (वार्ताहर)