शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 16:50 IST

नरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीने सोंडेने उचलून आदळल्याने एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव-पिंपळखुटी शिवारात गुरु वारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देराळेगाव तालुक्यातील घटनानरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेला हत्ती

लोकमत न्यूज नेटवर्कसुरेंद्र राऊतयवतमाळ : नरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीने सोंडेने उचलून आदळल्याने एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव-पिंपळखुटी शिवारात गुरु वारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. जखमी मजुराला यवतमाळच्या शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुभाष ललित पोटे (४५) रा. खडकी सुकळी असे जखमीचे नाव आहे. राळेगाव तालुक्यात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला. १२ जणांचे बळी घेतले. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने मध्यप्रदेशातून एका हत्तीला पाचारण करण्यात आले. या हत्तीवरून शोध मोहीम घेतली जात आहे. बुधवारी रात्री शोधमोहीम संपल्यानंतर या हत्तीला लोणी येथील वनचौकीत बांधून ठेवले होते. रात्री हा हत्ती साखळी सुटल्याने शेतशिवारात भटकला. गुरु वारी सकाळी सुभाष पोटे पत्नीसह झाडगाव येथे अंत्ययात्रेसाठी जात होता. झाडगाव-पिंपळखुटी शिवारात या हत्तीने अचानक सुभाषला सोंडेने वर उचलले आणि जमिनीवर आदळले. हा प्रकार पाहून घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. दरम्यान परिसरातील नागरिक तेथे धावून आले. हत्तीला हुसकावून लावत जखमी सुभाषला राळेगावच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून हत्तीला माहुताच्या मदतीने जेरबंद करून सावंगी येथील वन चौकीवर आणले. येथे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीची तपासणी करण्यात आली. हत्ती सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेतशिवारात फिरताना हत्तीला विजेचा धक्का लागल्याने तो गोंधळला आणि समोर दिसलेल्या सुभाषवर हल्ला केल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ