शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या रेशनसाठी दुकानदारांना तहसीलचे आवतन

By admin | Updated: May 24, 2017 00:29 IST

रेशनकार्डची ‘आॅनलाईन डाटा एंट्री’ न झाल्याने खेड्यापाड्यातील गरीब लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून धान्य मिळणे बंद आहे.

डाटा एंट्रीसाठी हजर व्हा : १५ जूनपर्यंत १०० टक्के ‘आधार फिडिंग’चे निर्देश अविनाश साबापुरे। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रेशनकार्डची ‘आॅनलाईन डाटा एंट्री’ न झाल्याने खेड्यापाड्यातील गरीब लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून धान्य मिळणे बंद आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच तहसील कार्यालय जागे झाले असून डाटा एंट्रीची संपूर्ण जबाबदारी तालुक्यातील १९२ रास्तभाव धान्य दुकानदारांवर सोपविण्यात आली आहे. तहसीलमध्ये विशेष कक्ष स्थापन करून रोज १० दुकानदार याप्रमाणे १५ जूनपर्यंत १०० टक्के आधार फिडिंग पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिले आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे सध्या शिधापत्रिका लाभार्थ्यांची माहिती आॅनलाईन करणे, दुबार नोंद, चुकीची नोंद, स्थलांतरित लाभार्थ्यांची नावे वगळणे अशी कामे सुरू आहेत. मात्र, ज्या वेबसाईटवर ही कामे करायची आहे, ती ‘महाफुड’ वेबसाईटच गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. परंतु, लाभार्थ्यांनी याची कल्पनाच देण्यात आली नाही. डाटा एंट्री न झाल्याने रास्तभाव धान्य दुकानदारांकडून धान्य देण्यात येत नाही. तर लाभार्थी डाटा एंट्री करून घेण्यासाठी यवतमाळ तहसीलमध्ये आल्यास त्यांना वेबसाईट बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘लोकमत’ने लाभार्थ्यांची ही आबबिती १७ मे रोजी ‘काम सरकारचे, हेलपाटे गरिबांना’ या मथळ्याखाली चव्हाट्यावर आणली. त्याची दखल घेत, तहसीलदारांनी आता डाटा एंट्रीची संपूर्ण जबाबदारी फक्त रास्तभाव धान्य दुकानदारांवर सोपविली आहे. २२ मे पासून १५ जूनपर्यंत दररोज दहा दुकानदारांना यवतमाळ तहसीलमध्ये बोलावून त्यांच्या दुकानातील सर्व लाभार्थ्यांची डाटा एंट्री करून घेतली जाणार आहे. त्यासाठी तहसीलमधील विशेष कक्षात दोन शिफ्टमध्ये कामाचे वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. दुकानदार, नोडल अधिकारी आणि डाटा एंट्री आॅपरेटर अशा तिघांना मिळून हे काम कोणत्याही स्थितीत १५ जूनपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत. दीड हजार पेंडिंग अर्जांचा खच पुरवठा विभागाची ‘महाफुड’ वेबसाईट सहा महिन्यांपासून बंद असल्याने रेशनकार्ड धारकांची आॅनलाईन डाटा एंट्रीच झाली नाही. त्यामुळे लाखो गरिबांना धान्यही मिळाले नाही. डाटा एंट्रीसाठी आतापर्यंत दीड हजार अर्जांचा खच तहसीलमध्ये येऊन पडला आहे. ‘लोकमत’च्या दणक्यानंतर सोमवारी वेबसाईटवरील डाटा फिडिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता तहसीलदारांनी रोज १० धान्यदुकानदारांना तहसीलमध्ये बोलावून त्यांच्याकडून डाटा एंट्री करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, लाभार्थ्यांनी स्वत: आणून दिलेल्या दीड हजार अर्जांना त्यात प्राधान्य मिळण्याची गरज आहे. तर दुसरीकडे, तालुक्यातील साडेतीन लाख लाभार्थ्यांपैकी दोन लाख लाभार्थ्यांचे आधार फिडिंग आटोपल्याचाही दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.