शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वणीत सोयाबीन पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:23 IST

सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे.

कृषी विभाग अनभिज्ञ : शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची भीतीलोकमत न्यूज नेटवर्कवणी : सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे. मात्र सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचे आक्रमण वाढले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.वणी तालुक्यात कपाशीसह सोयाबीन हे पीक प्रमुख पीक आहे. जुन महिन्यात लागवड झालेले पीक यावर्षी अनियमीत पावसामुळे व अळीच्या प्रादूर्भावामुळे प्रभावित झाले आहे. काही भागात जुनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेली पेरणी साधली. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत, तर काही ठिकाणी फुलोऱ्यावर येत आहे. अशा महत्त्वाच्या काळात सोयाबीनवर अळीचा प्रदूर्भाव वाढू लागला आहे. ढगाळ वातावरण राहत असल्याने या अळीला पोषक वातावरण मिळत आहे. ही उंट अळी हिरव्या रंगाची असून ती पानाचा हिरवा भाग फस्त करते. अळ्यांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या झाडावरील पानांची चाळणी झालेली दिसून येते. पानांची चाळणी झालेल्या झाडांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन पिकांची वाढ खुंटली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी स्वअनुभवावर किटकनाशकांचा वापर करीत आहे. मात्र कृषी विभागाकडून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही.दरवर्षी कृषी विभागामार्फत कोणती किटकनाशके फवारायची, याबाबत जनजागृती केली जायची. मात्र यावर्षी या अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला असतानाही कृषी विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तालुक्यातील गावागावात कृषी सहाय्यक भेटी देत असतात. मात्र त्यांनाही ही बाब लक्षात न येणे, हे न सजण्यासारखे कोडे आहे. काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांशी संपर्क साधला, तर संपर्क होत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शन व कोणते किटकनाशक फवारावे, याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.